मुख्य सामग्रीवर वगळा

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा गणेशोत्सव: पर्यावरण आणि समाजप्रबोधनाचा संगम

इंदापूर शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट गणेशोत्सवही पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे. संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्माताई भोसले,सचिव डॉ.गिरीश देसाई, खजिनदार श्री.तुषार रंजनकर, विश्वस्त श्री.अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे रक्षण आणि समाजप्रबोधन या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत, एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.
      या उत्सवासाठी गणपतीची मूर्ती जुन्या वर्तमानपत्रांपासून बनवण्यात आली आहे. हि मूर्ती संस्थेच्या जावेद हबीब अकॅडमी विभागातील विद्यार्थ्यांनी बनवली असून मूर्तीची सजावट करण्यासाठी कागदी प्लेट्स आणि विविध प्रकारच्या कागदांचा वापर करून एक आकर्षक, देखावा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बाप्पांचे वस्त्र ट्रस्टच्या फॅशन डिझाइन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे, ज्यामुळे बाप्पांचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
      या वर्षीच्या गणेशोत्सवाचा मुख्य विषय "मोबाईल व्यसनमुक्ती" आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. 
      गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. गणेशस्थापना सोहळ्यात ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख श्री.महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री.भारत बोराटे, कार्यकर्ते श्री.हमीद अत्तार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि सांगितले की, "गणेशोत्सव हा समाजाला योग्य दिशा देणारा उत्सव आहे. पर्यावरणपूरक उत्सवाबरोबरच मोबाईल व्यसनमुक्तीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे. हा उपक्रम खरंच खूप प्रेरणादायी आहे."

या कार्यक्रमाला ट्रस्टचे इन्चार्ज श्री.दिपक जगताप,  श्री.सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख श्री.अमोल राऊत,  सौ.त्रिशला पाटील,  सौ.रोहिणी जाधव, भारत माने उपस्थित होते 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच मूर्ती व डेकोरेशन यांचे काम करण्यात संस्थेच्या जावेद हबीब विभागातील विद्यार्थीश्रद्धा पवार, आदिती पवार, पुनम गवळी, सुरज जाधव, विजय दळवी, प्रीतम करगळ, विजय गोरे, आदित्य वाघमारे, जॅस्मिन बडकर, पवन नामदास, सपना गायकवाड, शितल राठोड, अथर्व सरोदे, समिक्षा कवितगे, वैष्णवी गुणवरे, जिनत सय्यद,सिंधू जाधव, साक्षी यादव, मंदा ढावरे , आरती कुंभार, अश्विनी बाबर या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...