चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल,& चेतना जुनियर कॉलेज येथे ७९वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
इंदापूर:- सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूल आणि चेतना जुनियर कॉलेज येथे ७९ स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रमुख इंदापूरचे दत्तात्रेय अनपट तसेच,उद्योजक संदीप जाधव आणि माननीय गोपीनाथ मोरे, निर्मिती कन्स्ट्रक्शन चे सर्वेसर्वा यांनी भूषवले.यावेळी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदयशेठ देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य, डॉ. गणेश म्हस्के व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य निकिता माने आधी उपस्थित होते याप्रसंगी प्रथम वर्ष बी. फार्मसी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या यशस्वी मुलींचे ही सत्कार करण्यात आले. तसेच चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग केलेला होता. त्याच्यामध्ये भाषण, लेझीम, मास पीटी अशा विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले म.अनपट यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले, तसेच शरीरासाठी योगासने कसे महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी पटवून दिले. संदीप जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि खेळ याविषयी माहिती सांगितली. तसेच गोपीनाथ मोरे यांनी स्वातंत्र्य वीर पुरुषांचा इतिहास मांडला आणि मुलांना त्याविषयी माहिती दिली. तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी आणि स्वातंत्र्याविषयी माहिती दिली व शुभ संकल्प करण्यास प्रेरित केले. अशाप्रकारे आजचा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. चेतना फाउंडेशन अध्यक्ष उदयशेठ देशपांडे यांच्याबरोबर विलास भोसले आणि सोमनाथ माने, प्राचार्य आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा.प्राजक्ता झगडे आणि स्कूलच्या प्रा. प्रांजली सुतार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
टिप्पण्या