मुख्य सामग्रीवर वगळा

*जयभवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या आकर्षक राख्या*

  इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये, 
राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणाऱ्या तसेच परकीय, अंतर्गत आक्रमणापासून देशाचे रक्षण करणाऱ्या, सीमेवर शांतता व सुरक्षा कायम ठेवणाऱ्या सैनिकांसाठी राखी बनवण्याचा अनोखा उपक्रम केला.
कुटुंबापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आणि राष्ट्रासाठी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ देणाऱ्या सर्व वीर जवानाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या जाणीवेतून , भारत मातेच्या रक्षण करणाऱ्या बंधूला दीर्घायु लाभावे या उद्देशाने आपली बहीण या नात्यानेच हितचिंतक म्हणून सैनिकांसाठी स्वतःच्या कौशल्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या, आकर्षक राख्यांची आकर्षक निर्मिती प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी स्वतः केली. हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षिका ट्विंकल देशमुखे व दिपाली चव्हाण, निकिता भोई यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले .
समाज जीवन जगत असताना आपण कोणाच्यातरी ऋणात राहत असतो तसेच आपले सैनिक सीमेवर लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत, हीच सैनिकाप्रती जाणीव ठेवून व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तसेच देशहितासाठी व देशवासीयांसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचा आदर या भावनेतून हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्रीमंत ढोले यांनी दिली.
हा अनोखा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले,मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, सचिव हर्षवर्धन खाडे, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...