मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेतल्याने गाव विकासामध्ये अग्रभागी-हर्षवर्धन पाटील•


इंदापूर : प्रतिनिधी दि.25/8/25
                           सर्वसामान्य नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व राहण्यासाठी घर महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने घरकुल योजनेचा सर्व्हे केल्याने बावडा ग्रामपंचायतीचा जिल्हामध्ये गौरव झाला आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे बावडा ग्रामस्थांनी आगामी 50 वर्षे पिण्याच्या पाण्याची काळजी करू नये. सामाजिक समतोल राखत, सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने विकास कामांमध्ये गाव अग्रभागी राहिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रविवारी (दि. 24) केले.
          बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजने (रु. 12. 05 कोटी) च्या 4 ठिकाणी बांधावयाच्या उंच साठवण टाक्यांचे भूमिपूजन, शॉपिंग सेंटर उभारणी व ग्रामसचिवालसमोर प्लेविंग ब्लॉक (रु. 25 लाख) टाकणे आदी कामांचे भूमिपूजन तसेच लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे लोकार्पण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव घोगरे होते.
        हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी प्रथमतः 6 कोटीची योजना प्रस्तावित होती. मात्र पुढील 50 वर्षांचा विचार करता सदर योजनेत भीमा नदीवरून नवीन स्वतंत्र पाईपलाईन टाकून गावामध्ये 1) रत्नप्रभादेवीनगर 2) घोगरेवस्ती 3)बारावाफाटा, 4) बागलफाटा येथे उंच साठवण पाणी टाक्या उभारण्यात येणार आहेत. या पाणी साठवण टाक्यांची आज आपण भूमिपूजन केले आहेत. गावासाठी रु. 12 कोटी 5 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ मंजुरी दिली आहे.
      गावामध्ये आता 441 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यातील काहींना आज प्रातिनिधीक स्वरूपात आपण प्रमाणपत्रे वाटप केलेले आहे. नुकताच गावामध्ये नव्याने घरकुलांसाठी सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये 1786 लाभार्थीं कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे, यांना आगामी काळात घरकुल मिळतील. तसेच गावामध्ये सन 2001 ते 2011 पर्यंतच्या अतिक्रमण जागेतील 954 कुटुंबांची घरकुले त्यांच्या नावावर होणार आहेत. तसेच गावामध्ये तरुणांसाठी हायस्कूल वर 400 मीटरचा ट्रॅक बनवण्यात येईल, तसेच अत्याधुनिक जिम उभारण्यात येईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राजकारणामध्ये केवळ राजकारणासाठी विरोध करणे, व्यक्तीद्वेष करणे अशी आपल्या गावाची संस्कृती नसल्याचे त्यांनी सांगितले. मी बावडेकर आहोत, याचा मला रास्त अभिमान असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
   यावेळी बोलताना अशोकराव घोगरे यांनी सांगितले की, नेत्याला विकासाची दूरदृष्टी असावी लागते, त्या दृष्टितूनच हर्षवर्धन पाटील यांनी गावासाठी 12 कोटी 5 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. गावामध्ये 32 पर्यंत दलित वस्त्या वाढविल्याने विकास कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
      यावेळी बोलताना निरा भीमा कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा आपण शिक्षकांची मदत घेऊन शिस्तबद्ध सर्व्हे केल्याने आता त्यामध्ये नव्याने सुमारे 1786 कुटुंबाचा सर्व्हे झाला आहे, त्यामुळे या कुटुंबांना आगामी काळात एकूण सुमारे 35 ते 36 कोटी रुपये निधी मिळेल.
        यावेळी बावडा गावातील हनुमान मंदिरासमोर हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी सुमारे 17 लाख रुपये खर्चून बांधलेल्या लोकनेते शहाजीराव (बापू) पाटील प्रवेशद्वार (गाव वेस ) चे उद्घाटनही हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रणजित घोगरे यांनी केले. यावेळी समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, सरपंच पल्लवी गिरमे, जल जीवन मिशनचे अभियंता सुधीर गोरे यांची भाषणे झाली. 
 यावेळी पाण्याच्या टाकीसाठी मोफत जागा दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे सह माऊली घोगरे, रणजीत गिरमे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
        यावेळी मनोज पाटील, माजी सरपंच किरण पाटील, अँड.अनिल पाटील, अमरसिंह पाटील, हरिभाऊ बागल, संतोष पाटील, विकास पाटील, प्रसाद पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, रणधीर पाटील, सुधीर पाटील, विजय घोगरे, मिलिंद पाटील, नामदेव घोगरे, विजय जगताप, इन्नूस मुलाणी, शिवाजीराव पवार, भगवान पांढरे, समीर मुलाणी, पवनराजे घोगरे, लक्ष्मण घोगरे, बाजीराव घोगरे, मुनीर आतार, संपत चव्हाण, विठ्ठल घोगरे, बलभीम घोगरे, तानाजीराव गायकवाड, रणजित गिरमे, संतोष सूर्यवंशी, काशिनाथ गायकवाड, अमोल घोगरे, स्वप्नील घोगरे, दादा कांबळे, धनंजय राऊत, मंगेश कांबळे, महादेव शिंदे, वसंत शेंडगे, दिलीप नायकुडे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे आदींसह ग्रा.पं. सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड यांनी केले. 
जल जीवन मिशनची रु. 12. 05 कोटीची योजना
 - हर्षवर्धन पाटील 
--------------------------------
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची बंगल्यावरती भेट घेऊन बावडा गावासाठी जल जीवन मिशनची रु. 6 कोटी ऐवजी रु. 12. 05 कोटी निधीची योजना मंजूर करून घेतली आहे. राज्यात 20 वर्षे कॅबिनेटमध्ये म्हणून काम करताना आपण राजकारण न करता सर्वांना मोठी मदत केली आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

--------------------------------
बावडा गावची लोकसंख्या वाढत असल्याने कायदा सुव्यवस्था चांगली राहणे आवश्यक आहे. त्यासाठी बावडा येथे सध्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन इमारत उभारणीचा प्रस्ताव असून, जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून सदरचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. यासंदर्भात गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन 4 कोटी रुपयांच्या पोलीस स्टेशन इमारतीचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. माळेगाव पोलीस स्टेशन प्रमाणे सदरची इमारत होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...