इंदापूर -पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकशास्त्र केंद्र (नासा) आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रो या प्रतिष्ठित संस्थांना भेटीची संधी मिळावी यासाठी तीन टप्प्यांत चाचणी परीक्षा घेण्यात आली होती.या उपक्रमासाठी आयुकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. हा उपक्रम विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा आहे.एकूण १६ हजार१२१ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.१३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी पहिली परीक्षा दिली.एक हजार ५४१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.मुलाखतीसाठी २३५ विद्यार्थी पात्र ठरले.७५ विद्यार्थी नासा व इस्रोला जाण्यासाठी पात्र ठरले.यापैकी २५ विद्यार्थ्यांची नासासाठी व ५०विद्यार्थ्यांची इस्रोला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील ४७२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.ऑनलाईन परीक्षेसाठी ४९ तर तिसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी १२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती.जिल्हा परिषद शाळा शहा,इंदापूर येथील मोहम्मदउमर समीर शेख हा सहावीत शिकणारा विद्यार्थी आहे.मोहम्मदउमर समीर शेख याची अंतराळ संशोधन क्षेत्रातील आवड ओळखून त्याची आत्या रूकसाना शेख यांनी त्यास प्रोत्साहन दिले.इंदापुर तालुक्यातून नासासाठी निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.शहरातील ज्येष्ठ मार्गदर्शक युसूफ शेख हे त्याचे आजोबा तर इरफान शेख यांचा तो पुतण्याआहे.इंदापूर नगरपरिषद गटनेते कैलास कदम यांनी त्याचे अभिनंदन केले.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वांकडून त्याचे कौतुक होत आहे.
टिप्पण्या