राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे शेतकरी कुंटूबातील आमदार दत्तात्रेय भरणे मामा यांचा राजकीय घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकत्यापासून सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रेय भरणे पक्षनिष्ठा, पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते आज आमदार, व मंत्रीपदाची शपथ घेतली. इंदापूरचे आ.दत्तात्रेय भरणे मामा शेतकरी कुंटूबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. कुंटूबाला राजकारणातील घराणेशाहीचा वारसा नाही. केवळ पक्षनिष्ठा व विकासकामांच्या जोरावर आज मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे. १९९२ साली वयाच्या २२ व्या वर्षी भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदापासून त्यांची सुरवात झाली. १९९६ साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेचे संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. संचालक पदाच्या संधीचे सोने करुन शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावले. २००१ साली जिल्हा बंकेचे अध...
SHIVSRUSTHI NEWS