इंदापूर: मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान ईद निमित्त सोमवार दि.१०/०५/२०२१ते दि.१३/०५/२०२१ या कालावधीकरीता इंदापूर शहरामधील दुकाने सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवण्यात यावे आशा आसयाचे निवेदन प्रातांधिकारी बारामती यांना देण्यात आले आहे,इंदापूर नगरपरिषदेची नगरसेविका, मीना ताहेर मोमीन ,रजिया हजरत शेख,
तसेच इतर मान्यवर व्यक्तींनी ०५/२०२१ रोजी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सन साजरा होत आहे. मुस्लिम धर्मियांचा सर्वांत मोठा सण असून सदर सणाकरीता मुस्लिम धर्मियांमधील गरीब व्यक्ती पासून श्रीमंत व्यक्ती हा सण अत्यंत चांगल्या पध्दतीने साजरा करतात. सदर सनाकरीता लहान मुले, मोठी व्यक्ती, स्त्रिया या नव नवीन कपडे तसेच इतर वस्तु खरेदी करतात. ऐन सणाच्या कालावधीमध्ये इंदापूर शहरामध्ये वि.१०/०५/२०२१ पासून ७ (सात) दिवसांकरीता कडक लॉकडाऊनची घोषणा करणेत आलेली आहे. सोलापूर, कोल्हापूर इ. शहरामध्ये ईद निमित्त लाकडाऊनमध्ये शिथिलता दिलेली आहे. इंदापूर शहरामध्ये कोरांना रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्या अनुषंगाने इंदापूर शहारामधील दुकाने हे दि.१०/०५/२०२१ पासून दि.१३/०५/२०२१ पर्यंत सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवणेबाबत तसेच कोवीडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन इंदापूर शहरामधील व्यापा-यांना दुकाने सुरु करणेबाबत आदेश जारी करण्या करीता, दत्तात्रय भरणे राज्यमंत्री , मा. तहसिलदार,. इंदापूर, मा. मुख्याधिकारी, इंदापूर नगरपरिषद इंदापूर , मा. पोलिस निरीक्षक सो. इंदापूर पोलिस स्टेशन,नगराध्यक्षा इंदापूर नगरपरिषद इंदापूर. यांना निवेदन देण्यात आले आहे,
टिप्पण्या