इंदापूर:कोविड संशयित रुग्णांसाठी उभारलेल्या 100 बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इसमा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी केले.
कोरोणा सध्या ग्रामीण भागातीही झपाट्याने वाढत चालला आहे, हा प्रसार थांबविण्याकरिता संशयित रुग्णांना विलगीकरण करणे व त्यांच्यावरती उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून हा प्रसार थांबवता येईल. भिगवण ग्रामपंचायतने आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे 100 बेडचे विलगीकरण केंद्र चालू केले आहे हे अत्यंत कौतुकास्पद व सर्व ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायक आहे. जर सर्व ग्रामपंचायतींनी असे संस्थात्मक विलगीकरण केंद्र चालू केले तर नक्कीच कोरोणा आटोक्यात येईल. असे यावेळी कु.
अंकिता हर्षवर्धन पाटील म्हणाल्या.
प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती परागभाऊ जाधव, इंदापुर पंचायत समितीचे उपसभापती संजयभाऊ देहाडे, संपततात्या बंडगर, सरपंच तानाजी वायसे, जावेद शेख, तुषार क्षीरसागर, कपिल भाकरे, जयदीप जाधव, हरिभाऊ पांढरे,सत्यवान भोसले, पत्रकार भरत मल्लाव, प्रशांत चवरे, सुरेंद्र शिरसट व इतर यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या