इंदापूर:-मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या ३० वर्षापासून सुरु आहे.मात्र शासनाची उदासीनता याला कारणीभूत आहे. न्यायालया पुढे बाजू मांडण्यात सरकार अपुरे पडले आहे. मराठा आरक्षण देण्या संदर्भात नक्की कोण विरोध करत आहे आणि कोण फसवित आहे याबाबत चार कोटी मराठा समाजाला सत्य वास्तव जाणुन घेण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर निकषांमध्ये बसणारे मराठा आरक्षण असून ते अनपेक्षितपणे रद्द करण्यात आल्यामुळे मराठा समाजावर अन्यायकारक आणि निराशाजनक आहे असे मत प्रा डॉ जयश्री गटकुळ जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा
यांनी व्यक्त केले या वेळी त्या म्हणाल्या की
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला असल्याने मराठा समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे.
मराठा समाजाने लाखोच्या संख्येने सहभागी होत मराठा क्रांती मोर्चा काढला तेव्हा शांतताप्रिय मराठा समाजाचा आदर्श साऱ्या जगात कौतुकास्पद ठरला होता हे सर्व समाजाला माहीत आहे.शासन दखल घेत नसेल तर मराठा समाजाने एकत्र येवून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा द्यावा लागेल.आसेही गटकुळ आमच्याशी बोलताना म्हणाल्या.
टिप्पण्या