इंदापूर तालुक्यातील जनतेला डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांची गरज आहे, त्यांना मुदतवाढ द्यावी-विठ्ठलराव ननवरे
इंदापूर:-कोरोना च्या महामारीत एकीकडे डाॅक्टर व मेडीसीनची कमतरता वरून एक डाॅक्टर कमी होत आहे, आणी दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी मंडळी यावर लक्ष देत नाही, नविन डाॅक्टर कधी येणार, त्या मुळे डाॅ. चंदनशिवे यांना मुदतवाढ द्यावी.आशी मागणींनी जोर धरला आहे,
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारित वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदणशिवे हे दि.31 मे 2021 रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत,मात्र कोरोनाची महामारी पाहता अशा भयावह प्रसंगी त्यांना सेवेतून मुक्त न करता त्यांना सेवेत मुदतवाढ द्यावी अशी मागणी गोरगरिबांचा कैवारी विठ्ठलराव(आप्पा)ननवरे माजी नगराध्यक्ष इंदापूर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली आहे.
या वेळी श्री.ननवरे म्हणाले की डॉ. एकनाथ चंदनशिवे हे इंदापूर तालुक्यात अनेक वर्षे म्हणजे च जुन्या सरकारी दवाखान्यात तही ते कार्यरत होते,
कोरोणा सारख्या महाभयंकर महामारीत तालुक्यातील रुग्णांना डॉ.चंदनशिवे हे आपलेच वाटतात,कोरोणा संपलेला नाही अशा परिस्थितीत डॉ. चंदनशिवे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होत असून डॉ. चंदनशिवे यांची उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील जनतेला गरज आहे. शासनाने त्यांना मुदतवाढ देणे गरजेचे आहे. आसे विठ्ठलराव आप्पा ननवरे पत्रकारांशी बोलताना सांगितले, या वेळी राजेशजी शिंदे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर,दादासाहेब सोनवणे माजी नगरसेवक, उपस्थित होते,
टिप्पण्या