इंदापूर :- बुध्द पौर्णिमे औचित्य साधून इंदापूर
शहरातील सिद्धार्थ गायन मंडळास संगीत वाद्य प्रविण भैय्या माने यांचेकडून भेट देण्यात आले
या मध्ये पेटी, पक्वाज, टाळ, इत्यादी वस्तुंचा समावेश आहे, आशी माहिती बाळासाहेब सरवदे यांनी दिली, या वेळी ते म्हणाले की काही दिवसापूर्वी प्रविण माने यांची भेट झाल्यानंतर त्यांना आमच्या सिध्दार्थ गायन मंडळासाठी संगीत वाद्याची मागणी केली होती, त्यांनी तात्काळ होकार देत आज रविवार दिनांक ३० मे रोजी सर्व साहित्य भेट देवून आमच्या गायन मंडळाला उपकृत केले एवढयावरच माने थांबले नाहीत तर त्यांनी आलेल्या कलावंताची आस्थेने विचारपूस करून कोरोना काळात कलाकारांच्या व्यथा समजून घेवून लागलीच सर्व कलावंताना आर्थिक मदत केली, आर्थिक मदत देवून त्यांच्या संसाराला हातभार लावला,त्या मुळे मंडळाच्या वतीने प्रवीण माने यांचे आभार मानले या वेळी
सिध्दार्थ गायन मंडळ इंदापूर बाळासाहेब सरवदे ( संयोजक ) शाहीर भिमराव चितारे
शाहीर अतुल सोनकांबळे ढोलकीपटू बापूराव ढावरे
गायक सुखदेव मखरे उपस्थित होते,
टिप्पण्या