राजकारणातील राजहंस दत्तात्रय मामा भरणे
शेतकरी कुंटूबातील आमदार दत्तात्रेय भरणे मामा यांचा राजकीय घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकत्यापासून सामाजिक कामांना सुरवात करणारे आमदार दत्तात्रेय भरणे पक्षनिष्ठा, पारदर्शक कारभार व विकासकामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते आज आमदार,
इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणून विकासकामांच्या जोरावर भरणे मामा यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली.पाच वर्षामध्ये विरोधी पक्षाचा आमदार असतानाही जिल्हामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला. याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आमिषाला भरणे बळी पडले नाहीत. त्यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. विकासाच्या जोरावर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भरणे मामा यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यादां पराभव केला. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून संधीचे सोने केल्याशिवाय मामा राहणार नाही.तुर्तास एवढे च की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजकारणात मदतीचा हात पुढे करून त्यांच्या सहवासात घेतले,म्हणून मला लाभलेला राजकारणातील एक राजहंस म्हणजेच दत्तात्रय भरणे मामा, तसेच आमच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
सौजन्य:- श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक इंदापूर
सौजन्य:- श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक इंदापूर
टिप्पण्या