मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी यांच्या वतीने बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील शेकडो कुटुंबियांना दिपावली निमित्त आनंद भेट इंदापू र (प्रतिनिधी):गरीब कुटुंबात राहून गरीबी च्या झळा, वेदना ज्यांनी सोसल्या आहेत.आशा ढोले कुटुंबीयांनी या  लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित,गरीब कुटुंबीयांना दिपवाली सणानिमित्त आनंद भेट वितरण कार्यक्रमामुळे, राज्यावर कोरोना तसेच आपत्तीचे संकट असताना देखील गरीबांना गोड घास खाता येणार असल्याचे गौरवोद्गार कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी काढले.          जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी तालुका इंदापूर या संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांनी आयोजित केलेल्या दिवाळी आनंद भेट विशेष कार्यक्रमात कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मणराव आसबे बोलत होते.बावडा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,मुख्य मार्गदर्शक प्रदीप गुरव,या संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

चाळीस मिनिटाचे चार तास शाळेत होणार : वर्षा गायकवाड मुंबई : महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या पुर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हा - जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन - अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे . 40 मिनिटांचे चार तासच शाळा होणार आहे. ही शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सुचनाही शिक्षण विभागाने या पुर्वीच जाहीर केल्या आहेत व या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिके द्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत आरोग्य चाचणी राज्यात होतच आहे. अशा वेळी शाळेतील वर्ग सु...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

दिवाळीपूर्वी शेतकरी व ग्रामस्थांना नुकसानीची आर्थिक मदत मिळावी - हर्षवर्धन पाटील           - भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी  - शेतमजूरांना धान्य वाटप करा इंदापूर:प्रतिनिधी दि.9/11/20           अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संपुर्ण क्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत व दिवाळीपूर्वी शेतकरी व घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना शासनाकडून नुकसानीची आर्थिक मदत मिळावी तसेच अतिवृष्टीमुळे शेतमजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना  मोफत धान्य वाटप करण्यात यावे,अशी मागणी  जिल्हा भाजपच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचेकडे करण्यात आली आहे,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि.9) दिली.                   राज्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान पुणे जिल्ह्यात झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी  डॉ.राजेश देशमुख यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली व चर्चा केली. ...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर तहसील कार्यालया॒- समोर बाटली फोड आंदोलन, प्रहार जनशक्ती पक्षाच्या व प्रहार अपंग क्रांती संस्था इंदापुर यांच्या पहिल्याच आंदोलनाने प्रशासकीय अधिकार्‍यांचे धाबे दणाणले इंदापुर:  दि 6.रोजी ‌ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू  राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य,संपर्कप्रमुख मा.अजय महाराज बारस्कर व पुणे जिल्हा संघटक शिवश्री नीरज भाऊ कडू पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली बाटली फोड आंदोलन करण्यात आले इंदापूर तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत आलेला असून यावर ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे ते अधिकारी मात्र सोयिस्करपणे डोळे झाकून बसलेले आहेत.या मागचं कारण काय असेल असा प्रश्न तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे.याबाबत ‌ प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सदरच्या गोष्टीबाबत तालुक्यात पहाणी केली असता तालुक्यात शेकडो ठिकाणी अवैध धंदे सुरू असुन सदरचा प्रकार चाललेला खरा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण कार्यकारिणीने तालुका अध्यक्ष संजय राऊत, उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के, शहराध्यक्ष अनिल मोहिते ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कंत्राटी,हंगामी व रोजंदारी कर्मचारी कमी करू नका या साठी मुख्यमंत्र्यांना साकडं,राज्यमंत्री दतात्रय भरणे यांना दिले निवेदन इंदापूर: राज्यभरात विविध यंत्रणेमार्फत भरणा केलेले आरोग्य विभागातील कार्यरत व कामावरून कमी केलेले सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेचे, मा. सर्वोच्च न्यायालय/मा. उच्च न्यायालय यांस केंद/राज्य शासन किंवा त्यांचे वतीने आरोग्य विज्ञान, व हवामान विभागातील विशेषज्ञांकरवी शपथपत्र सादर करून मान्य करेपर्यंत कर्तव्यावर ठेवण्याबाबत पुढील आदेश देण्यात यावेत.आशा आशयाचे निवेदन राज्यमंत्रीदतात्रय भरणे यांना देण्यात आले, आशी माहिती, संतोष (भाऊ) चतुर्भुज भांडे सामाजिक कार्यकर्ता यांनी दिली, ते निवेदनात म्हणाले की                  'कोरोना' या महाभयंकर व जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केलेल्या साथरोगास आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून राज्यभरातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने, तसेच साधन सामुग्री  व विविध पदांवर कर्तव्य बजावणारे शिक्षीत व प्रशिक्षी...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट इंदापुर; पुणे जिल्हा भाजपाने शिष्टमंडळासह नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.  पुणे जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्था व अवैध धंदे यावर कायदेशीर कारवाई करून जिल्ह्यात भयमुक्त वातावरण निर्माण करावे ही मागणी केली. तसेच त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना एकसमान वागणूक द्यावी अशी मागणी देखील भाजपा शिष्टमंडळाने यावेळी केली. याप्रसंगी पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट, मा.ना.हर्षवर्धन पाटील माजी मंत्री मा. संजयजी भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष मा. गणेशजी भेगडे, मा.आमदार बाबुरावजी पाचार्णे, मा.अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद श्री. जालिंदर कामठे, श्री. रविंद्र भेगडे, श्री. धर्मेंद्र खांडरे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कृष्ण सुदामा भेटीचे हे जणूकाही चित्रच ...!   भर उन्हात आपल्या कार्यकर्त्याचे अनवाणी पाय पाहताच राजवर्धन पाटील यांनी दिली, स्वतःच्या पायातील चप्पल  कृष्ण सुदामा भेटीचे हे जणूकाही चित्रच ...! इंदापुरःतालुक्यातील जनसामान्यांचे नेतृत्व मा.राजवर्धनदादा पाटील हे रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२० रोजी गणेशवाडी येथे सांत्वन भेटीसाठी गेले असता मा.राजवर्धन पाटील  निष्ठावान व कार्यतत्पर कार्यकर्ते श्री. आकाश उर्फ बारकू जालिंदर घोगरे यांना दादा विविध सांत्वन भेटीसाठी आल्याचे समजताच, धावपळीत पायात चप्पल न घालताच ते दादांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी दादांबद्दलचे प्रेम त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते,  राजवर्धन पाटील  त्यांच्या बद्दल आपुलकी आणि प्रेम असल्यामुळे दोघांनाही खूप आनंद झाला. राजवर्धन पाटीलांचे लक्ष कार्यकर्त्याच्या अनवाणी पायाकडे जाताच स्वतःच्या पायातील चप्पल त्यांना काढून दिली व भेटीचा आनंद व्यक्त केला असे जनसामान्यांचे नेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्या भेटीचा सोहळा गणेशवाडी येथे पहावयास मिळाला कृष्ण सुदामा भेटीचे हे जणूकाही चित्रच उपस्थितांना...