मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी यांच्या वतीने बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील शेकडो कुटुंबियांना दिपावली निमित्त आनंद भेट

इंदापूर (प्रतिनिधी):गरीब कुटुंबात राहून गरीबी च्या झळा, वेदना ज्यांनी सोसल्या आहेत.आशा ढोले कुटुंबीयांनी या  लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित,गरीब कुटुंबीयांना दिपवाली सणानिमित्त आनंद भेट वितरण कार्यक्रमामुळे, राज्यावर कोरोना तसेच आपत्तीचे संकट असताना देखील गरीबांना गोड घास खाता येणार असल्याचे गौरवोद्गार कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी काढले.


         जय भवानी गड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी तालुका इंदापूर या संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांनी आयोजित केलेल्या दिवाळी आनंद भेट विशेष कार्यक्रमात कामधेनू सेवा परिवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मणराव आसबे बोलत होते.बावडा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,मुख्य मार्गदर्शक प्रदीप गुरव,या संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा निरिक्षक शौकतभाई तांबोळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचाचे तालुका अध्यक्ष निलकंठ मोहिते,सागर शिंदे , श्रमिक पत्रकार संघ इंदापुर तालुका अध्यक्ष सुरेशराव मिसाळ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इंदापुर तालुका सचिव धनंजय कळमकर ,महेश स्वामी,   बाळासाहेब सुतार, दिपक शिंदे, जितेंद्र जाधव, दिपक खिलारे, तात्याराम पवार, इमतीयाज मुलाणी, आबासाहेब उगलमोगले, संदिप सुतार,सोमनाथ ढोले,भिमराव आरडे,उदयसिंह जाधव,रामदास पवार,शिवकुमार गुणवरे,आदम पठाण,भिमसेन उबाळे,राजेंद्र भोसले,अक्षय आरडे,तसेच लाखेवाडी गावचे सरपंच सोमनाथ भिंगारदिवे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


                  पुढे बोलताना डॉ.आसबे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्या ज्यांना कळतात ते खर्यां अर्थांने सामाजिक जिवणात यशस्वी होतात.यासाठी दानत हि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.अशीच गोरगरिबांच्या अडचणी दुख: जानणारा ढोले परीवार असुन,आपले धन सुध्दा उत्तम व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी सज्ज असतात.ज्या लोकांची मने सर्व दृष्टीने तृप्त झालेले आहेत.तेच लोक दानधर्म करत असतात त्यामुळे याचे सर्व श्रेय त्यांच्या माता-पित्यांना जात असते.एका गरीब कुटुंबातून जन्म घेऊन,गरिबांच्या हजारो मुलाबाळांना अद्ययावत शिक्षण प्रणाली देण्याची भूमिका श्रीमंत ढोले यांनी घेतलेली आहे.  माणसाने वासनेला जाळून बहिण-भावाचे नाते निर्माण केले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होतो,
या वेळी चित्रलेखा ढोले यांनी उपस्थितांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या,

            यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले म्हणाले की,संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आहे.तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात पुढे गेला पाहिजे,यासाठी लातूर पॅटर्न ही संस्था राबवत असून,कमी वयाची संस्था असून देखील राज्यांमध्ये अनेक परीक्षेत प्रथम येण्याचा मान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.

तर कोरोना च्या कालावधीत परिसरातील गावांना स्वच्छ-सुंदर आरोग्य राहण्यासाठी,संस्थेने वेळोवेळी मदत केली आहे.तसेच लाखेवाडी परिसरामध्ये 50 हजार वृक्षलागवड संस्थेच्या माध्यमातून झालेले आहे.आपत्ती ग्रस्त शेतकरी व कोरूना पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांचे प्रचंड हाल चालले आहे.त्यामुळे रितीरिवाजाप्रमाणे सालाबाद प्रमाणे दिपवाळी सण या कुटुंबात साजरा व्हावा.या उद्देशाने दिवाळी आनंद भेट मधून सणा साठी लागणारे सर्व साहित्य मोफत वाटप करण्यात आले आहे.आगामी काळात देखील सामाजिक जाणिवेतून काम केले जाईल अशी ग्वाही श्रीमंत ढोले यांनी दिली.

              यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या वतीने श्रीमंत ढोले संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,यांनी केले तर आभार प्रदिप गुरव यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...