मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापुर: दि 6.रोजी ‌ प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू
 राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य,संपर्कप्रमुख मा.अजय महाराज बारस्कर व पुणे जिल्हा संघटक शिवश्री नीरज भाऊ कडू पाटील.
यांच्या मार्गदर्शनाखाली बाटली फोड आंदोलन करण्यात आले इंदापूर तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत आलेला असून यावर ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे
ते अधिकारी मात्र सोयिस्करपणे डोळे झाकून बसलेले आहेत.या मागचं कारण काय असेल
असा प्रश्न तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे.याबाबत ‌ प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सदरच्या गोष्टीबाबत तालुक्यात पहाणी केली असता तालुक्यात शेकडो ठिकाणी अवैध धंदे सुरू असुन सदरचा प्रकार चाललेला खरा असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या संपूर्ण कार्यकारिणीने तालुका अध्यक्ष संजय राऊत, उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के, शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर  पोलीस स्टेशनचे पी आय सारंगकर साहेब,तसेच इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी  यांना 26/9/2020रोजी निवेदन देण्यात आले होते.
निवेदनात तालुक्यातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.
यावर दहा दिवस उलटून गेले तरीही,यावर काहीही कारवाई झालेली दिसुन येत नाही.प्रहार पक्षाच्या ह्या निवेदनाकडे त्यांनी गंभीरतेने लक्ष घातलेले दिसून येत नाही . त्यामुळे दि 6 नोव्हेंबर रोजी इंदापूर तहसील कार्यालया॒- समोर बाटली फोड आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.
आंदोलन चालू असताना
तहसील कार्यालयाकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना चर्चा करण्यास बोलावून घेतले व  यावर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश इंदापूर पोलिस स्टेशनचे पी. आय. सारंगकर यांना देण्यात आला.सदरील आदेशानुसार कारवाई न झाल्यास पुढील काळात प्रहार स्टाइलने‌ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.असे आमच्या प्रतिनिशी बोलताना प्रतिक्रिया सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सदरचे आंदोलन यशस्वी करण्यामागे प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका कार्यकारणी, तसेच प्रहार अपंग क्रांती संस्था, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे , इंदापूर शहराध्यक्ष दीपक आरडे, कार्यकर्ते अनंतराव गायकवाड ,भोसले, ‌ इत्यादी कार्यकर्त्यांनी व पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी अध्यक्ष अशोक शिंदे व इतर कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे सरचिटणीस तानाजी (अण्णा )धोत्रे, रिपब्लिकन क्रांती सेना चे संस्थापक अध्यक्ष ‌ प्राध्यापक बाळासाहेब लोखंडे सर, बसपाचे कार्यकर्ते श्रीपती चव्हाण , दलित पॅंथर माथाडी कामगार संघटना इंदापुर शहराध्यक्ष व नामदार बच्चु भाऊ यांचेवर प्रेम करणारे
सोनू भाऊ ढावरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...