भर उन्हात आपल्या कार्यकर्त्याचे अनवाणी पाय पाहताच राजवर्धन पाटील यांनी दिली, स्वतःच्या पायातील चप्पल
इंदापुरःतालुक्यातील जनसामान्यांचे नेतृत्व मा.राजवर्धनदादा पाटील हे रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२० रोजी गणेशवाडी येथे सांत्वन भेटीसाठी गेले असता मा.राजवर्धन पाटील निष्ठावान व कार्यतत्पर कार्यकर्ते श्री. आकाश उर्फ बारकू जालिंदर घोगरे यांना दादा विविध सांत्वन भेटीसाठी आल्याचे समजताच, धावपळीत पायात चप्पल न घालताच ते दादांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी दादांबद्दलचे प्रेम त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते,
राजवर्धन पाटील त्यांच्या बद्दल आपुलकी आणि प्रेम असल्यामुळे दोघांनाही खूप आनंद झाला. राजवर्धन पाटीलांचे लक्ष कार्यकर्त्याच्या अनवाणी पायाकडे जाताच स्वतःच्या पायातील चप्पल त्यांना काढून दिली व भेटीचा आनंद व्यक्त केला असे जनसामान्यांचे नेतृत्व आणि कार्यकर्ता यांच्या भेटीचा सोहळा गणेशवाडी येथे पहावयास मिळाला कृष्ण सुदामा भेटीचे हे जणूकाही चित्रच उपस्थितांना पहावयास मिळाले.
कार्यकर्ता आणि नेतृत्व यांचे हे नाते पाहून कोणालाही हेवाच वाटेल. असे जनसामान्यांचे हक्काचे नेतृत्व मा.राजवर्धनदादा पाटील असून, कार्यकर्त्यांना मान देण्याची पद्धत व सर्वसामान्य माणसांबद्दलचा आपलेपणा व जिव्हाळा* पाहून तुकाराम महाराजांच्या *"दुःखी हे जण पाहता डोळा। येतो कळवळा म्हणुनिया॥''* या उक्तीचा प्रत्यय या भेटीतून येतो.
टिप्पण्या