मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कंत्राटी,हंगामी व रोजंदारी कर्मचारी कमी करू नका या साठी मुख्यमंत्र्यांना साकडं,राज्यमंत्री दतात्रय भरणे यांना दिले निवेदन

इंदापूर: राज्यभरात विविध यंत्रणेमार्फत भरणा केलेले आरोग्य विभागातील कार्यरत व कामावरून कमी केलेले सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव संपुष्टात आलेचे, मा. सर्वोच्च न्यायालय/मा. उच्च न्यायालय यांस केंद/राज्य शासन किंवा त्यांचे वतीने आरोग्य विज्ञान, व हवामान विभागातील विशेषज्ञांकरवी शपथपत्र सादर करून मान्य करेपर्यंत कर्तव्यावर ठेवण्याबाबत पुढील आदेश देण्यात यावेत.आशा आशयाचे निवेदन राज्यमंत्रीदतात्रय भरणे यांना देण्यात आले, आशी माहिती, संतोष (भाऊ) चतुर्भुज भांडे सामाजिक कार्यकर्ता यांनी दिली, ते निवेदनात म्हणाले की
                 'कोरोना' या महाभयंकर व
जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केलेल्या साथरोगास आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून राज्यभरातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने, तसेच साधन सामुग्री  व विविध पदांवर कर्तव्य बजावणारे शिक्षीत व प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने, तसेच 'कोरोना' कोविड १९ चा प्रभाव वाढून दिवसेंदिवस रूग्णांच्या  संख्येत हजारोंच्या संख्येने वाढल्याने, यास आटोक्यात आणण्याकरीता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांर्गत व महापालिका अंतर्गत कार्य करणाऱ्या, जिल्हा एकात्मिक आरोग्य विभागाच्या यंत्रणा मार्फत, ऑनलाईन जाहीराती प्रमाणे, कक्षसेवक,ANM. GNM. डाटा एन्ट्री ऑपरेटर, फार्मासीस्ट, डॉक्टर्स, सफाई कामगार, विविध तंत्रज्ञ टेक्नीशीयन,भांडारपाल, आदी व इतर पदांची भरती कोरोना' हा साथरोग नियंत्रणात संपुष्टात येईपर्यंत च्या अटींवर कंत्राटी व रोजंदारी पद्धतीने गुणवत्ता व अनुभवाच्या आधारावर थेट नियुक्ती आदेशाच्या माध्यमातून हाजारोंच्या संख्येने नोकर भरती केली गेली, अशा पकारे राज्यभरातील अरोग्य यंत्रणा सक्षम करणेच्या दृष्टीकोनातून योग्य तीभूमिका घेण्यात आली.
आशी माहिती संतोष (भाऊ) चतुर्भुज भांडे सामाजिक कार्यकर्ता यांनी दिली,ते म्हणाले की
मे,जून,जुले,ऑगस्ट, सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालखंडात कोरोनाचे संकमण प्रचंड प्रमाणात वाढतच राहिले, अशा वेळी राज्यभरामध्ये वरील प्रमाणे भरती केलेले व पुर्वीपासून कार्यरत असणाऱ्या आरोग्य विभागात
स्वत:च्या व आपल्या कुटुंबियाच्या जिवाची तमा न बाळगता केवळ माणव सेवा हाच आपुला धर्म  या विचाराने भारावलेल्या सर्व कर्मचा-यांनी लक्षावधी नागरीकांचे प्राण वाचवले, या दरम्यान अनेक प्रकारे या कर्मचाऱ्यांना 'कोविड योद्धा' हे संबोधन देवून त्यांचा सन्मानही करण्यात आला.

यात राज्यभरातील कंत्राटी, हंगामी व रोजंदारीवरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून, कंत्राटी, हंगामी
व रोजंदारी कर्मचारी हे आज महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचा कणा आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ,देशभरात प्रतिवर्षी
२० कोटी नागरीकांना लस उपलब्ध होईल असे, लस उत्पादक सिरम या कंपनी मार्फत सांगितल्याची प्रसार माध्यमातून चर्चा आहे असे असले तरी एकंदरीत सदर कोरोना हा महाभयंकर साथरोग किमान पाच वर्ष तरी
आटोक्यात येईल काय? हा संशोधनाचा विषय आहे . त्यातच राज्यभरातील गामीण, उपजिल्हा व दुर्गमभागातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व रूग्णालयांना पुरवण्यात आलेल्या व्हेंटीलेटसचे संच चालवण्या करतीताअध्यपही प्रशिक्षीत तंत्रज्ञांची कमतरता आहे व राज्याच्या आरोग्य विभागात विविध पदे अध्यापही रिक्त
असल्याचे उघड आहे.असे असताना महाराष्ट्राच्या अनेक कोविड केअर सेंटर बंद करून राज्यातील  कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावलेल्यांना व नागरिकांचे प्राणांचे रक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्यावरून हटवून शासन जनतेच्या जीवाशी खेळ करत तर नाही ना? तसेच कर्मचाऱ्यांच्या भवितव्या विषयी ही शासन गंभीर नसल्याचे दिसून येते आहे.आसेही
संतोष (भाऊ) चतुर्भुज भांडे सामाजिक कार्यकर्ता यावेळी म्हणाले,
        अन्यथा या बाबत योग्य त्या न्यायालयातन्याययाचना करून राज्यभर संवैधानिक आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येणार आसल्याची माहिती
मा. संतोष (भाऊ) चतुर्भुज भांडे सामाजिक कार्यकर्ता यांनी दिली ,या वेळी  सत्वशिला  पाटोळे अंजली पवार ,सौदागर शिंदे, पदम चव्हाण, राखी पोळ ,सोनी देवकर,वैभव वाघमारे.. यांनी निवेदनाद्वारे दिली ..
हे कोवीड कामगार यांना ३ महिन्यासाठी ठेवले होते ,त्यांचे म्हणणे आहे आम्हाला ११ महिने ठेवावे आशा आसयाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून यांच्या प्रती  मा . अजित (दादा) पवार,उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई .मा राजेशजी टोपे साहेब,
सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई .दत्तात्रय विठोबा भरणे,सार्वजनिक बांधकाम, मृदा व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यपालन आणि सामान्य प्रशासन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा इन्सीडन्ट कमांडर, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन .
सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वृत्तवाहिनी संपादक तथा प्रतिनिधी,यांना पाठवण्यात आले आहेत आशी माहिती निवेदनात दिली आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...