मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर.- मा.भरतशेठ शहा नगराध्यक्ष

  इंदापूर शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार दि. २७/०२/२०२६ रोजी इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या वेळी नगराध्यक्ष श्री भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ श्री. बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते श्री अनिल पवार व सर्व सदस्य तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांनी आपले मनोगत मांडताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्न् वाढ यास अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी, श्री रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी अपेक्षीत उत्पन्न स्रोत व विकास कामांचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती दिली. इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने सन 2025-26 या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. कोणतीह...

उजनी धरणग्रस्त शेतक-यांच्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी दिले.

उजनी धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी दिले. इंदापूर मतदारसंघातील व परिसरातील उजनी धरणग्रस्त शेतक-यांना भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटीस तात्काळ रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व कृषी मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांनी भेटून दिले.  वास्तविक पाहता उजनी धरणाच्या निर्मितीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड, कर्जत तालुक्यातील ८१ गावांनी त्याग केलेला आहे या गावातील शेतक-यांनी सर्वस्वी त्याग केलेला आहे. नाममात्र किंमतीमध्ये शासनाने हजारो शेतक-यांची मालमत्ता संपादित केलीली आहे. मात्र हा त्याग जनहितासाठी केलेला आहे. या धरणग्रस्तांचे अदयाप योग्य पुनर्वसन देखील झालेले नाही. अनेक उजनी धरणग्रस्त शेतकरी गावे, नागरी सुविधा पासून वंचि...

संत गाडगेबाबा जयंती निमित्त इंदापूरमध्ये स्वच्छता मोहिम

संत गाडगेबाबा जयंती निमित्त इंदापूरमध्ये स्वच्छता मोहिम इंदापूर, दि. २३ फेब्रुवारी २०२६ : इंदापूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून शहरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर मोहिमेस मा. नगराध्यक्ष श्री. भरत शेठ शहा, मा. उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे-पवार, नगरपरिषदेचे मा. पदाधिकारी तसेच मा. मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या वेळी बोलताना नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा म्हणाले की संत गाडगे वावा स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज यांची आज जयंती. माणसातच देव आहे असे सांगणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले , व स्वच्छता मोहिमेची सुरुवात श्रीराम चौक येथून करण्यात आली. यावेळी शंभर फूटी रोड येथील संत गाडगेबाबा यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची...

*निरा भिमा सर्व गाळप झालेल्या ऊसाची बिले देणारा राज्यातील पहिला कारखाना*

नीरा भीमा कारखान्याकडून चालु हंगामातील सर्व ऊस बिले रु. 3101 प्रमाणे बँकेत जमा- भाग्यश्री पाटील इंदापूर : प्रतिनिधी दि.20/2/26                                                 शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामाअखेर गाळप झालेल्या सर्व ऊसाला पहिला हप्ता प्रती टन रु. 3101 प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि.20) जमा करण्यात आला आहे. राज्यात चालू गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या सर्व ऊसाची बिले शेतकऱ्यांना अदा करणारा नीरा भीमा कारखाना हा बहुधा पहिला कारखाना आहे, अशी माहीती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.         नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा चालु सन 2025-26 चा गळीत हंगाम दि. 6 फेब्रुवारी अखेर संप...

*भिमाई आश्रमशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी.*

इंदापूर (दि.१९) इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संपूर्ण डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल भगव्या पताकांनी तसेच आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेत होता. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड,समीर मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती देण्यात आली. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी परि...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये शिवजयंती व संस्थेचा 8 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19/02 /2026 रोजी शिवजयंती व संस्थेचा 8 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रम प्रसंगी प्रतिरूप शिवाजी, शिवाजी पालखी मिरवणूक सोहळा, लेझीम नृत्य, ढोलपथक, शिवाजी पुतळ्याचे पूजन, शिवप्रतिमा पूजन, शिवजन्माचा पाळणा, विद्यार्थी मनोगत, मान्यवर मनोगत,शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. श्रीमंत ढोले यांची पुणे जिल्हा परिषद सदस्य नूतन निवड झाली त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.   शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी JBVP संस्था कट...

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा*

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * पुणे, दि. १९ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.  छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इत...

शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी, स्फूर्ती देणारे - सोमनाथ ढोले सर

शासकीय निवासी शाळेत जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. इंदापूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा तरंगवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पोवाडे गायन व भाषणे केली .या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सोमनाथ ढोले सर हे उपस्थित होते. यावेळी ढोले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढायां सांगून रोमांचित केले तसेच शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी विस्तृतपणे माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कुकडे आर आर यांनी भूषविले.शिवाजी महाराजांसाठी लोक जीव द्यायला का तयार होते ?याविषयीचे विवेचन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले गृहपाल हेळकर सर यांनी शिवचरित्रातून काय शिकावे ? याविषयी मार्गदर्शन केले . सावंत मॅडम यांनी शिवजयंती निमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप केले .या कार्यक्रमास झाटेराव मॅडम , मरळे सर , ...

*यंदा शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक नाही.* - *ॲड. राहुल मखरे*

इंदापूर दि.१७(प्रतिनिधी) - इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्ट इंदापूर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनाचा काळ वगळता सलग ११ वर्षापासून साजरी करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दि.२८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी दुखःद निधन झाल्याने सबंध राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून हळूहळू व्यक्त केली जात आहे. आमच्या मनातही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने अत्यंत दुःख व संवेदना आहे. त्यामुळे यंदा दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी निघणारी जेतवन बुद्धविहार (डॉ. आंबेडकरनगर) ते इंदापूर नगरपालिका मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक व विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जयंती महोत्सव समितीच्या वतीने घेतला असल्याची माहिती कमिटीचे आयोजक ॲड. राहुल मखरे यांनी पत्रकारांना दिली आहे.

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य विजया रहाटकर

‘ इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये  महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी  या तंत्राच्या केवळ ‘वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि  निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये  आज दुपारी राष्ट्रीय महिला आयोग , आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना  आणि संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण व संशोधन संस्था (युनिटार) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एआय आणि आर्थिक शक्ती - महिला नेतृत्वातील समृद्धीची रूपरेषा या  विषयावर आयोजित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ...

भिमाई परिवारातर्फे “होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न

इंदापूर (दि.१६) शिवजयंती निमित्त होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भिमाई परिवाराच्या वतीने भिमाई आश्रमशाळेच्या प्रांगणात शनिवारी (दि.१४) सायं.६:०० वाजता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता. “होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा” हा रंगतदार, आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात गलांडवाडी नंबर २ च्या माजी सरपंच आशाताई गलांडे, विद्याताई शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, संचालक अस्मिता मखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत, तथागत गौतम बुद्ध,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, अहिल्यादेवी होळकर, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर व माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, पासिंग बॉल, एकमेकींचे फुगे फोडणे, टेबलवरील ग्लास तोंडाने उचलणे, पिठातील कॅटबरी तोंडाने काढणे, वाट्यांमधील गोट्या चमच्याने काढणे, डोळ्यावर पट्टी बांधू...

धनगर समाजाच्या वतीने प्राजक्ता दुर्गाडे यांचा सत्कार

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहिरे गटात नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांचा धनगर समाजाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी वाल्हे येथील मसनेर देवाच्या मंदिरात धनगर समाजाने मसनेर देवाचे मनोभावे आभार व्यक्त करूनच डॉ. प्राजक्ता दुर्गाडे यांचा जाहीर नागरी सत्कार केला आहे. या प्रसंगी धनगर समाजाचे नेते दादासाहेब मदने सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार वाल्हे ग्रामपंचायत सदस्य शीतल मदने यांसह पोपट मदने बबन मदने सिद्राम मदने शिवा मदने मनोज घाटे अनिकेत मदने राहुल मदने विनय मदने अमोल मदने सदाशिव मदने दत्तात्रेय मदने यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक ,अध्यक्ष तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री.श्रीमंत ढोले यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना यशवंत, गुणवंत व्हावे यासाठी दिल्या शुभेच्छा

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री. श्रीमंत ढोले यांनी आजपासून सुरू झालेल्या बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना यशवंत, गुणवंत व्हा अशा शुभेच्छा दिल्या.आजपासून उच्च माध्यमिक शालांत HSC परीक्षा सुरू होत आहेत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास आकार देण्याचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून सर्वानी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, ही परीक्षा सर्वाना सोपी जावी व उत्तम गुणप्राप्ती मिळावी.          * यशस्वी भव! * हा शुभेच्छा संदेश संस्थेचे अध्यक्ष या नात्याने दिला.  तसेच प्रशालेतील परीक्षेसाठी येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांला writing प्याड,व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले  परीक्षार्थी विद्यार्थी प्रशालेमध्ये आल्यावर त्यांचे औक्षण करण्यात आले.      सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज लाखेवाडीचे प्राचार्य गणेश पवार, शिक्ष...

भिमाई आश्रमशाळेत मुलींनी लेझीम नृत्य सादर करत माता रमाईंना दिली मानवंदना.

*इंदापूर*: (दि.७) त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकरांना १२८ व्या जयंतीदिनी आश्रमशाळेत रमाईंच्या लेकींनी उत्साहपूर्ण लेझिम नृत्य सादर करून त्यांना मानवंदना अर्पण केली.  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तथागत गौतम बुद्ध, माता रमाई, माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरेंच्या प्रतिमांना स्वप्निल जाधव, उत्कर्षा नगरे, माधुरी कडवळे आदी विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दीपप्रज्वलन गीतांजली सुतार, राजनंदिनी घनवट, रमा लोकरे, कोमल सुखदेव,शौर्या शिंदे आदी मुलींनी केले.  राजनंदिनी घनवट हिने माता रमाईंची पारंपारिक वेशभूषा साकारत त्यांना अभिवादन केले. नऊवारी साडी, साधी केशरचना आणि संयमी व्यक्तिमत्व अशा रूपात माता रमाईंच्या त्यागमय जीवनाची जिवंत झलक सादर केली.  माता रमाबाई आंबेड...