इंदापूर (दि.१६) शिवजयंती निमित्त होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भिमाई परिवाराच्या वतीने भिमाई आश्रमशाळेच्या प्रांगणात शनिवारी (दि.१४) सायं.६:०० वाजता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता.
“होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा” हा रंगतदार, आनंददायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात गलांडवाडी नंबर २ च्या माजी सरपंच आशाताई गलांडे, विद्याताई शिंदे, संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, संचालक अस्मिता मखरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत, तथागत गौतम बुद्ध,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, अहिल्यादेवी होळकर, फातिमा शेख, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर व माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, पासिंग बॉल, एकमेकींचे फुगे फोडणे, टेबलवरील ग्लास तोंडाने उचलणे, पिठातील कॅटबरी तोंडाने काढणे, वाट्यांमधील गोट्या चमच्याने काढणे, डोळ्यावर पट्टी बांधून खराट्याने फुगे फोडणे, गाणी-ओळखा, उखाणे स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये महिलांनी सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला. खेळांदरम्यान हास्यविनोदाने वातावरण भारावून गेले होते.
स्पर्धेतील विजेत्या नंदिनी माने यांना प्रथम बक्षिस आकर्षक पैठणी साडी देऊन “होम मिनिस्टर” किताब प्रदान करण्यात आला. सुषमा घनवट यांना द्वितीय बक्षीस सोन्याची नथ, मनीषा शिंदे यांना तृतीय बक्षीस मिक्सर, आशा आहेर यांना चतुर्थ बक्षीस कुकर, तर पाचवे बक्षीस माया भोसले यांना हळदी कुंकवाचा करंडा देऊन गौरविण्यात आले. निवासी विद्यार्थ्यांच्या महिला पालकांना १०० साड्यांचे वाटप भिमाई परिवाराकडून करण्यात आले .यावेळी गलांडवाडी नं.२ चे माजी सरपंच गोपीचंद गलांडे, संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे,पत्रकार अतुल सोनकांबळे, नानासाहेब चव्हाण परमेश्वर मखरे,सुरज धाईंजे, तेजस मखरे,आझाद सय्यद, सुहास राऊत तसेच मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सादरीकरण प्रसिद्ध निवेदक कुमार महाराज शिंदे व राहूल बिबे यांनी केले तर आभार नानासाहेब सानप यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमाई परिवारातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पण्या