पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहिरे गटात नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांचा धनगर समाजाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी वाल्हे येथील मसनेर देवाच्या मंदिरात धनगर समाजाने मसनेर देवाचे मनोभावे आभार व्यक्त करूनच डॉ. प्राजक्ता दुर्गाडे यांचा जाहीर नागरी सत्कार केला आहे.
या प्रसंगी धनगर समाजाचे नेते दादासाहेब मदने सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार वाल्हे ग्रामपंचायत सदस्य शीतल मदने यांसह पोपट मदने बबन मदने सिद्राम मदने शिवा मदने मनोज घाटे अनिकेत मदने राहुल मदने विनय मदने अमोल मदने सदाशिव मदने दत्तात्रेय मदने यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या