इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19/02 /2026 रोजी शिवजयंती व संस्थेचा 8 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रतिरूप शिवाजी, शिवाजी पालखी मिरवणूक सोहळा, लेझीम नृत्य, ढोलपथक, शिवाजी पुतळ्याचे पूजन, शिवप्रतिमा पूजन, शिवजन्माचा पाळणा, विद्यार्थी मनोगत, मान्यवर मनोगत,शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. श्रीमंत ढोले यांची पुणे जिल्हा परिषद सदस्य नूतन निवड झाली त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळावे यासाठी JBVP संस्था कटिबद्ध आहे, शिवरायांचे आचार, विचार व त्यांचा वारसा चालवला तरच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो असे अनमोल मार्गदर्शन केले. व सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या, शिवमय शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले ,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर, शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या