मुख्य सामग्रीवर वगळा

*भिमाई आश्रमशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी.*

इंदापूर (दि.१९) इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संपूर्ण डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल भगव्या पताकांनी तसेच आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेत होता.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड,समीर मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती देण्यात आली. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमात विद्यार्थीनींनी शिवाजी महाराजांच्या जन्मावर पाळणा गीत सादर करून भक्तीभावाची रंगत वाढवली. एका विद्यार्थीनीने जोश पूर्ण शिवगर्जना देऊन सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरेंसह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इंदापूर शहरातील डॉ.आंबेडकर नगरातील जेतवन बुद्धविहारात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी इंदापूर नगरपालिकेच्या मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यांना व श्री पांडुरंगाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे उभारले, शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणं, गीते, पोवाडे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. लेझीमचे अप्रतिम सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी सायंकाळी शाहीर विजय सरतापे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे सादर केले. शेवटी एकत्रित शिवगर्जनाने कार्यक्रमाची सांगता झाली. नानासाहेब सानप यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी कार्यक्रमास संचालक अस्मिता मखरे,गोरख तिकोटे, सामाजिक कार्यकर्ते अश्वजीत कांबळे, नानासाहेब चव्हाण,तेजस मखरे, शितल पलंगे, राजाभाऊ गायकवाड,सुहास मखरे, परमेश्वर मखरे, सूरज धाईंजे, फारुख मुल्ला, बापू मखरे, सत्यवान भोसले ,विजय खामगळ, आदींसह अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर, विद्यार्थी, पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...