इंदापूर दि.१७(प्रतिनिधी) - इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्ट इंदापूर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनाचा काळ वगळता सलग ११ वर्षापासून साजरी करण्यात येत आहे.
परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दि.२८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी दुखःद निधन झाल्याने सबंध राज्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून हळूहळू व्यक्त केली जात आहे. आमच्या मनातही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने अत्यंत दुःख व संवेदना आहे. त्यामुळे यंदा दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी निघणारी जेतवन बुद्धविहार (डॉ. आंबेडकरनगर) ते इंदापूर नगरपालिका मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक व विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जयंती महोत्सव समितीच्या वतीने घेतला असल्याची माहिती कमिटीचे आयोजक ॲड. राहुल मखरे यांनी पत्रकारांना दिली आहे.
टिप्पण्या