*इंदापूर*: (दि.७) त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकरांना १२८ व्या जयंतीदिनी आश्रमशाळेत रमाईंच्या लेकींनी उत्साहपूर्ण लेझिम नृत्य सादर करून त्यांना मानवंदना अर्पण केली.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तथागत गौतम बुद्ध, माता रमाई, माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरेंच्या प्रतिमांना स्वप्निल जाधव, उत्कर्षा नगरे, माधुरी कडवळे आदी विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दीपप्रज्वलन गीतांजली सुतार, राजनंदिनी घनवट, रमा लोकरे, कोमल सुखदेव,शौर्या शिंदे आदी मुलींनी केले.
राजनंदिनी घनवट हिने माता रमाईंची पारंपारिक वेशभूषा साकारत त्यांना अभिवादन केले. नऊवारी साडी, साधी केशरचना आणि संयमी व्यक्तिमत्व अशा रूपात माता रमाईंच्या त्यागमय जीवनाची जिवंत झलक सादर केली.
माता रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील गीतांवर लेझीमवर नृत्य सादर करत व रमाईंवरील विविध गीत गायनाने विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
राजनंदिनी जाधव,आराध्या निकाळजे,आयशा जाधव, वैशाली शिंदे,स्वरा दळवी, नेहा शिंदे,तनुजा जाधव आदी मुलींनी भाषणातून माता रमाईंचा त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी कार्याचा संदेश प्रभावीपणे मांडला.
अप्रतिम लेझीम नृत्य सादर करणाऱ्या देवयानी माने, तनिषा आरडे, वैष्णवी गायकवाड, ईश्वरी आगवणे, स्नेहा अवघडे, रेणुका माळी या मुलींना संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी रोख बक्षीस देऊन कौतुक केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे - मखरे, अधिक्षक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया दळवी,आरती शेंडगे,संचिता माने यांनी केले तर आभार प्रणव जाधव याने मानले.
टिप्पण्या