इंदापूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा तरंगवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पोवाडे गायन व भाषणे केली .या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सोमनाथ ढोले सर हे उपस्थित होते. यावेळी ढोले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढायां सांगून रोमांचित केले तसेच शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी विस्तृतपणे माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कुकडे आर आर यांनी भूषविले.शिवाजी महाराजांसाठी लोक जीव द्यायला का तयार होते ?याविषयीचे विवेचन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले गृहपाल हेळकर सर यांनी शिवचरित्रातून काय शिकावे ? याविषयी मार्गदर्शन केले . सावंत मॅडम यांनी शिवजयंती निमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप केले .या कार्यक्रमास झाटेराव मॅडम , मरळे सर , निंबाळकर सर,व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळकर सर यांनी केले .
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या