मुख्य सामग्रीवर वगळा

नीरा भीमा कारखान्याची उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल - सौ.भाग्यश्री पाटील

 इंदापूर:-शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालु सन 2025-26 च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि. 5) जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी गुरुवारी (दि.4) दिली.
        नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कारखान्याने मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. चालु 25 व्या ऊस गळीत हंगामामध्ये सुमारे 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेच्या दृष्टीने कारखान्याची वाटचाल सुरु आहे, अशी माहिती अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी दिली.
      सद्य:स्थितीत कारखान्याला आर्थिक अडचण असतानाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टरित्या चालू असून, बुधवार (दि. 3) अखेर कारखान्याने 2 लाख मे. टन ऊसाचे गाळप करीत 145300 क्विं. साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा आजचा साखर उतारा 10.70 टक्के असून, सरासरी साखर उतारा 10.00 टक्के एवढा आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 3500 मे. टन असून सध्या सरासरी 5700 ते 5900 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून आज अखेर 7230041 युनिट वीज एक्स्पोर्ट करण्यात आली आहे. तर इथेनॉलचे आजअखेर 1690100 लि. उत्पादन निघाले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे बायोगॅस, सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने सुरु आहेत. त्याबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांचे सौ.भाग्यश्री पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
शेतकी विभागाच्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार गळीत हंगाम जोरात सुरू असून, शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असेही भाग्यश्री पाटील यांनी नमूद केले.
     यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
**********************
-----------------------------------
__________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...