*पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर मित्र परिवारातर्फे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टी, गेल्या 35 वर्षाची परंपरा कायम*
इंदापूर: - गेल्या 35 वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार या ही वर्षी लोकनेते तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्षम जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रदीप (दादासाहेब) गारटकर मित्र परिवारातर्फे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषदेचे मा. सदस्य श्रीमंत ढोले सर, इंदापूर नगरीचे मा.नगराध्यक्ष विठ्ठल (आप्पा) ननवरे, मा. नगराध्यक्ष सुरेश (नाना) गवळी, मा. उपनगराध्यक्ष राजेशजी शिंदे, मा. उपनगराध्यक्ष सादिकभाई बागवान, मा. नगरसेवक श्रीधर (भाऊ) बाब्रस, मा. नगरसेवक लियाकतभाई पठाण, मा. नगरसेवक अनिल राऊत, सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक मखरे सर, इंदापूर शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक मा.अमर (दादा) गाडे, मा. नगरसेवक स्वप्नील (भैय्या) राऊत, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे कार्याध्यक्ष गफूरभाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते वसंत माळुंजकर, मा. नगरसेवक प्रशांतदादा सिताफ, इंदापूर शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष इम्रानभाई शेख, इंदापूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष अहेमदरजा (तशुभाई) सय्यद, इंदापूर शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष वसीमभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते राकेश गानबोटे, सामाजिक कार्यकर्ते मुशीरभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई मोमीन, सामाजिक कार्यकर्ते अल्लीभाई मोमीन, फकीरभाई पठाण, मेहबूबभाई मोमीन, चांदभाई पठाण,आझादभाई पठाण, मुन्नाभाई बागवान, अन्सारभाई शेख, शकीलभाई बागवान, मुनीरभाई बागवान, रियाजभाई बागवान, शुभमभाऊ मखरे, आनंद (गोटू) मखरे, साजन ढावरे, अमजदभाई शेख, बाळासाहेब पाटोळे, इंदापूर शहरातील सर्व मशिदीचे मौलाना व मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होता यावेळेस प्रदीप गारटकर यांनी मनोगतात गेले 35 वर्ष त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी इंदापूर शहर आणि तालुक्यात जपलेला सर्वधर्म समभावाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, बंधू भावाचा, कशाप्रकारे जोपासला याचे वर्णन करून मुस्लिम समाजाला येथून पुढेही सर्व क्षेत्रात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि वैयक्तिक काहीही अडचण आली तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मागील काळात ही उभा होतो आणि पुढील काळातही उभा राहणार आहे असे आश्वासन दिले सर्व समाजाला रमजान महिन्याच्या आणि येणाऱ्या ईद च्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी विठ्ठल आप्पा नवरे, श्रीधर भाऊ बाब्रस, गफूरभाई सय्यद, अहेमदरजा (तशुभाई) सय्यद, तय्यबभाई शेख, यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याचे आणि येणाऱ्या रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या आदरणीय प्रदीप गारटकर यांचे हस्ते इंदापूर शहरातील सर्व मशिदीच्या मौलाना यांना पोशाख (ड्रेस) वाटप करण्यात आले तसेच के.जी.एन ग्रुप आणि इंदापूर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने प्रदीपदादा गारटकर आणि वसंत माळुंजकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन अहेमदरजा (तशुभाई) सय्यद यांनी तर आभार मा. नगरसेवक अनिलदादा राऊत यांनी मानले!
टिप्पण्या