इंदापूर:-

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाअगोती (जिल्हा -पुणे ) ते अमेरिकाअसा खडतर शिक्षणप्रवास कसा होता हे डॉ.दत्तात्रय मासाळ यांनी सांगताना तारे जमीनपे याचा अनुभव आला. सामान्य शेतकरी कुटुंबातील दत्ता दहावीपासून काम करीत शिक्षण घेत असून दहावी नंतर शेती आणि मेंढी पालन केले
बीएससीचे शिक्षण घेताना रात्रीच्या वेळी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम केले.एमएससीचे शिक्षण घेताना ट्युशन क्लासेस घेऊन शिक्षणाचा खर्च स्वतः केला अमेरिका येथे वेस्ट लॅफायटे शहरातील परड्यू विद्यापीठात डॉक्टरेट रिसर्च असोसिएट म्हणून संशोधन करण्याची संधी मिळाली असून वार्षिक चाळीस लाख रुपये स्कॉलरशिप मिळाली आहे. आजच्या काळात पालक लाखो रुपये खर्च करून देखील मुलं शिकत नाहीत पण गरीब विद्यार्थ्यांनी जीवनात काहीतरी करायचे आहे हे ध्येय ठेवले तर मेंढपाळ ते संशोधक असा शिक्षण प्रवास होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले. डॉ दत्तात्रय मासाळ यांचा शाल आणि पुषगुच्छ देऊन डॉ.जीवन सरवदे आणि प्रा जयश्री गटकुळ यांनी सन्मान केला.
कार्यक्रमासाठी डॉ. महादेव शिंदे, डॉ.राजेंद्र भोसले, प्रा सचिन खरात प्रा.प्रांजली माने, प्रा श्वेता खोपडे, प्रा.मयुरी शिंदे, प्रा कविता गोंड, प्रा.फरजाना शेख, प्रा कविता देवकाते अन्य मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या