मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन राज्य बलवान होऊ दे, अन्नदाता बळी राजा, महिला व कामगार सबलीकरण होऊ दे असे घातले साकडे
इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी राज्य सर्वात बलवान होऊ दे, अन्नदाता बळीराजा, महिला तसेच कामगारांचे देखील सबलीकरण होऊ दे असे साकडे त्यांनी देवास घातले. मुख्यमंत्री येणार असल्याने नीरा नरसिंहपूर गावास पोलीस छावणी तसेच जनयात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राज्याचे
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाची पूजा अर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री नृसिंह यांची कर्पूर तसेच महाआरती केली तसेच श्री लक्ष्मीचे दर्शन घेतले. मंदिराचे मुख्य पुजारी प्रसाद दंडवते यांनी पूजा केली. प्रदक्षिणा वेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील बिडकर ओवरी सह कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली. मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभयकुमार वांकर, डॉ. प्रशांत सुरू यांनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. ग्रामस्थांच्यावतीने सरपंच अर्चना सरवदे तसेच सदस्यांनी स्वागत केले. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी हेलीपॅड वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी विलास वाघमोडे, आबा गुरगुडे, पिंटू काळे, कुबेर पवार, सुभाष काळे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, माऊली चवरे, विजय काळे, पद्मजादेवी मोहिते पाटील, सुलक्षणादेवी मोहिते पाटील, सरपंच अर्चना सरवदे आदि मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. त्यांनी मंदिरात अभिषेक घालून व दर्शन घेतले. यावेळी समस्त ब्रम्हवृंदाच्या वतीने श्री लक्ष्मी नृसिंहाच्या जयघोषात अभिषेक व पुजा करण्यात आली. त्यानंतर त्यांना श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यानंतर मंदिरात सुरू असणाऱ्या विकास कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
चौकट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुलदैवता च्या दर्शनासाठी आल्यानंतर तसेच देवदर्शनानंतर मित्र दशरथ राऊत यांच्या चहाचा आवर्जून घेतात. त्यानुसार त्यांनी आज देखील चहा पिण्याची परंपरा चहाचा आस्वाद घेवून पाळली. मात्र त्यानंतर त्यांनी चाॅपरने पुढील दिशेने लगेच प्रयाण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दौऱ्याचे ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी अनुभवले व ते भाविकांची मने जिंकून निघून गेले असे वर्णन करावे लागेल. काही नागरिक निवेदन देण्यासाठी आले होते मात्र त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत सुरक्षा यंत्रणेमुळे पोहोचता आले नाही. त्यामुळे नागरिकांची पळापळ झाली मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ कमी असताना देखील आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद घेतल्याने या तीर्थक्षेत्राचे महत्व अधोरेखित झाले.
टिप्पण्या