इंदापूर* : ( दि.१) - येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुध्दांच्या मूर्तीस व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेला संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भिमाई आश्रमशाळेचे कर्मचारी श्री. बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते ध्वजपूजन केले.तर ध्वजारोहण माध्यमिक आश्रमशाळेचे कर्मचारी श्री.संतोष शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संचालक गोरख तिकोटे,मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक,प्राध्यापक,अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.तर मान्यवरांचे आभार हिरालाल चंदनशिवे यांनी ...
SHIVSRUSTHI NEWS