*इंदापूर मध्ये अजित पवार गटात उभी फूट.आप्पासाहेब जगदाळे शेकडो कार्यकर्त्यांसह करणार शरद पवार गटात प्रवेश*
आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंत माने व आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून स्वबळावर एखादी अजित पवार गटाची इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता आणली होती.
त्या अगोदर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध निवडून गेले होते. हेच आप्पासाहेब जगदाळे उद्या स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत. आप्पासाहेब जगदाळे यांच्या शरद पवार गटात जाण्याने सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसणार असून अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
त्यामुळे चालू असलेले लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांच्याच गटातील एक एक मोहरे शरद पवार गटात सामील होत आहेत.
टिप्पण्या