इंदापूर:- बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा जनाधार वाढवण्यासाठी इंदापूर शहरातून नेते मंडळींनी नव्हे पण सामान्य कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे,नेते एकीकडे आणि मतदार एकीकडे आहे, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी,ही सामान्य जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक विरोधकांना भारी पडल्याशिवाय राहणार नाही आणि इंदापूर शहरातून तीन हजार मतांनी सुप्रियाताई सुळे यांना लिड देऊ आसे भरतशेठ शहा म्हणाले, समोर कितीही मोठे नेते असले तरी मतदार व जनसामान्य माणसं हेच जाणता राजा शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्र पवार यांची ताकद असून त्यांची कन्या सुप्रियाताई सुळे या इंदापूर तालुक्यातून लाखांच्या मतांनी पुन्हा खासदार होतील आसे भरतशेठ शहा म्हणाले,यावेळी बापूराव जामदार, शकिलभाई सय्यद,प्रमोद राऊत, श्रीकांत मखरे, समदभाई सय्यद,सुनिल तळेकर, अरबाज शेख,सह इतर मान्यवर उपस्थित होते.
आमच्याकडे कोणीही वरिष्ठ मोठा नेता नसला तरी आमच्याकडे मतदार मात्र तगडे आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत घराघरात पोहोचून मतदान करण्यास त्यांना विनंती करून मतदान करण्यास सांगू ,सर्व इंदापूर करांनी तुतारी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे, आसे आवाहन इंदापूर चे दमदार नेतृत्व मा.भरतशेठ शहा यांनी केले आहे. या वेळी बोलताना भरतशेठ शहा म्हणाले की,राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आसे ही ते म्हणाले,दुध दरवाढ नाही,दुष्काळ जाहीर नाही,दुष्काळ निधी नाही, पाणीटंचाई, जनावरांचा चाराप्रश्न,उजणी धरण रिकामं झाले,शेतकरी कर्जबाजारी झाले,बेरोजगारी वाढली,व्यापारी हतबल झाले,यावर कोणीच बोलत नाही,नेते मालामाल,जनता बेहाल,म्हणून आपण यावर आवाज उठवणाऱ्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना निवडून देऊ आसे भरतशेठ शहा म्हणाले, त्यांनी इंदापूर शहरातील जैन मंदीर परिसरातून सुरूवात करून, आय काॅलेज परीसरात पाटील बंगला पर्यंत सर्व परीसर पिंजून काढत घर टू घर तुतारी चा प्रचार जोरदार करत आहेत त्यांना लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,आसे मत बापूराव जामदार यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या