*यवतमाळ येथील घटना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करणा-या चा इंदापूरात जाहीर निषेध -अशोकराव देवकर*
इंदापूर:-यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथे असलेल्या भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करणाय चा जाहीर निषेध व संबंधितावर कारवाई करण्यासाठी इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले, .दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रपिता फुले यांच्या जयंती महिन्यातच महात्मा फुले चौक यवतमाळ येथील राष्ट्रपिता फुले यांच्या पुतळ्यावर कोण्या तरी समाजकंटकाने शाईफेकून विटंबना केलेली आहे. त्याचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आसे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पै.श्री. अशोक बाबु देवकर संघटक, पुणे जिल्हा यांनी व्यक्त केले. पुढे निवेदनात नमूद करण्यात आले की, ज्या महामानवाने या देशातील शिक्षणाचा पाया घातला बहुजन समाजाला शिक्षणाच्या वाटा खुल्या करून दिल्या समता प्रस्थापित करण्यासाठी काम केले, सत्याचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली. अशा महामानवाच्या पुतळ्याच्या पाठीवर शाई फेकणाऱ्या व्यक्तीचा आणि प्रवृत्तींचा आम्ही जाहीर निषेध कस्तो. अशा मानवतावाद विरोधी प्रवृती शिक्षेस पात्र आहेत.सदर प्रकाराची स्वतंत्र चौकशी पथकाद्वारे चौकशी करून महामानवाची विटंबना करणाऱ्या व्यक्ती व प्रवृतींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात याची व भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी ही विनंती. अन्यथा संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.आसा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद श्री. अशोक बाबु देवकर संघटक, पुणे जिल्हा यांनी दिला या निवेदनाच्याप्रती ,मा.श्री. छगन भुजबळ साहेब संस्थापक/अध्यक्ष,मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई-३२मा. तहसिलदार तहसिल कार्यालय इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे यांना पाठविण्यात आल्या, या वेळी कृष्णाजी यादव, अनिल राऊत, पोपट शिंदे,रमेश शिंदे,नागनाथ व्यवहारे बाळासाहेब व्यवहारे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या