उन्हाचा पारा वाढताच इंदापूरकरांची पावले कुलर,एसी, खरेदीकडे,पण कुलरचा तुटवडा,जास्तच भाव खात आहे, आला ऊन्हाळा तब्येत सांभाळा...!
इंदापूर:-
उन्हाचा पारा वाढताच इंदापूरकरांची पावले कुलर, एसी, फ्रीज आदी वस्तू खरेदीकडे वळत आहेत. शहरातील पेठ तसेच इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये दररोज शंभर ते दीडशे कुलरची विक्री होत आहे. यंदा कुलरच्या किमती वाढलेल्या आहेत. चार फुटाच्या कुलरसाठी पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. कुलरसाठी लागणारे लोखंड आणि लोखंडी चादर महागली आहे. त्यामुळे कुलरच्या किमतीत वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.इंदापूर शहरात उन्हाचा पारा वाढला आहे,उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशात थंड हवेशिवाय उन्हाळा काढणे अशक्य आहे. कुलर खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे. दररोज छोट्या-मोठ्या कुलरची विक्री होत आहे. शहरात ब्रॅंडेड कुलर उपलब्ध असले तरी बाजारपेठांमध्ये ब्रॅंड नसलेल्या, स्थानिक व्यावसायिकांनी बनविलेल्या कुलरला देखील चांगली मागणी असल्याचे यावेळी दिसून आले. दोन ते अडीच फुटांपासून तर आठ फुटांपर्यंत कुलर उपलब्ध असून, त्यांच्या किमती अडीच हजारांपासून सात हजारांपर्यंत आहेत. तसेच कुलरसाठी लागणारे वूडवूलचे भाव ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोचले आहेत. तसेच मजुरी वाढल्यानेही कुलरच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा उन्हाचा पारा वाढल्याने कुलर खरेदी वाढली आहे. होळीनंतर बाजारात तेजी वाढली आहे.
फायबर कुलरला मागणी
सध्या बाजारात कुलरसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच फ्रीज, एसी, कुलर आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पाच हजारांपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत किमती असल्या तरी ग्राहक खरेदी करण्यास पसंती देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागरिक फायबरच्या कुलरची मागणी करीत आहेत. लोखंडाचे भाव वाढल्याने लोखंडी कुलरच्या किमती वाढल्या आहेत.मागील आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कुलर, एसी, फ्रीज आदीं वस्तूंना मागणी वाढली आहे. आगामी काळात मागणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.आसे व्यापारी सांगतात,
टिप्पण्या