*श्री नारायणदास रामदास जुनियर कॉलेज इंदापूर मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शाळा संपर्क अभियान संपन्न*
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नारायणदास रामदास जुनिअर कॉलेज इंदापूर येथे संपर्क अभियान घेण्यात आले.
सदर अभियानामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची सविस्तर माहिती व महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व या विषयाची माहिती विभागीय सल्लागार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालयप्रमूख ,पुणे येथील उत्तमराव जाधव व कार्यालयीन प्रमुख संतोषजी वामन ,डॉ.भास्कर गटकुळ व प्रा.युवराज फाळके यांनी विद्यार्थ्यांना नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत अन्तर्गत प्राचार्य संजय सोरटे यांनी विद्यार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्रा. औदुबर चांदगुडे प्रा .नवनाथ गाडे प्रा. संदिप अनभुले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री औदुंबर चांदगुडे आणि प्रा. नवनाथ गाडे यांनी आभारप्रदर्शन मानले.
टिप्पण्या