मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वाल्हे नगरीत मसनेर देवाच्या यात्रेचा जल्लोष

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या वाल्हे गावच्या मदने वस्तीत मसनेर देवाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. महापूजा, रुद्राभिषेक आणि महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी'मसनेर देवाच्या नावाने चांगभलं' आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने संपूर्ण वाल्हे परिसर दुमदुमून गेला होता. दुपारच्या सत्रात देवाच्या पालखीचा छबिना आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या तालावर आणि खोबरे-भंडाऱ्याची उधळण करत निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत करून औक्षण केले.तर वाल्हेसह पुरंदर परिसरातील हजारो भाविकांनी उत्सवमूर्तींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे दादासाहेब मदने यांसह भाऊ मदने शिवा ...

🛑 इंदापूर तालुक्यात 'रस्त्यावर' शेतीचा बस्तान! वीस फुटाचा रस्ता संकुचित होऊन झाला अवघा दहा फुटाचा; प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?

> साईटपट्ट्या, गार्डस्टोन, किलोमीटर स्टोन गायब; दोन वाहने एकमेकांसमोर आल्यास ट्रॅफिक जॅमची डोकेदुखी! इंदापूर: ग्रामीण भागाचा विकास हा देशाचा कणा मानला जातो, आणि या विकासाची मुख्य वाहिनी म्हणजे गावोगावाला जोडणारे रस्ते. मात्र, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या याउलट चित्र पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून तयार केलेले रस्ते आज शेतकऱ्यांच्या मुजोरी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रस्ते कोरून थेट शेतीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रकार वाढीस लागल्याने वीस फुटांचा रस्ता आता अवघ्या दहा फुटांवर आला आहे , ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहे अतिक्रमाचा विळखा (फेसओफेस शेती): रस्त्याकडेच्या जमिनी असलेल्या काही शेतकऱ्यांनी हद्द ओलांडून थेट रस्त्यावरच नांगरटी केली आहे. 'फेसोफेस' (सामोरासमोर) रस्ता कोरून शेती केल्यामुळे रस्त्याचे मूळ अस्तित्वच धोक्यात आले आहे. वीस फुटांचा रस्ता दहा फुटांवर: प्रत्यक्षात वीस ते पंचवीस फूट रुंद असणारे हे रस्ते अतिक्रमणामुळे आकुंचन पावून केवळ आठ ते दहा फुटांचे उरले आहे...

कर्मयोगी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; मयुरसिंह पाटलांचा विद्यमान नेतृत्वावर गंभीर आरोप!

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील कणा मानल्या जाणाऱ्या 'कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्या'च्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र (अर्ज) भरण्याची मुदत असून, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. चेअरमन मयुरसिंह पाटील यांनी कारखान्याच्या कारभारावर आणि खाजगीकरणावर तीव्र आक्षेप घेत पत्रकार परिषदेत गंभीर खुलासे व आरोप केले आहेत. मुख्य मुद्दे आणि ठळक घडामोडी - निवडणूक वेळापत्रक: निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान अर्ज स्वीकारले जात आहेत, तर १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान होईल. - कारखान्याची पार्श्वभूमी व महत्त्व: उजनी धरणामुळे इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीकフー लागल्याने, दिवंगत सहकारमहर्षी शंकरराव बाजीराव पाटील यांनी वालचंदनगरचा खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर आणून 'कर्मयोगी'ची स्थापना केली. हा कारखाना म्हणजे या भागाची 'जीवनवाहिनी' असून, याद्वारे १ लाख लोकांचा उदरनिर्वाह चालतो...

भीमानगर-रांजणी जिल्हा परिषद शाळेतील कामाला अखेर स्थगिती! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी अक्षय यादव यांच्या तक्रारीची दखल

शाळेच्या वेळेत धरण विभागाचे काम बंद ठेवण्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे निर्देश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य भीमानगर, दि. २ : माढा तालुक्यातील भीमानगर-रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात उजनी धरण व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजात आणि शिक्षकांच्या अध्यापनात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार अक्षय महादेव यादव यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत उजनी धरण व्यवस्थापन विभागाने शाळेच्या नियमित वेळेत कामकाज करू नये, तसेच सुरू असलेले काम बंद ठेवावे, असे स्पष्ट निर्देश संबंधित उपविभागाला दिले आहेत. अक्षय यादव यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात निवेदन सादर केले होते. शाळेच्या आवारात सुरू असलेल्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या निवेदनाच्या अनुषंगाने उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तातडीने कार्यवाही करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून संबंधित विभागाला सूचना दिल्या. विभागाने दिलेल्या लेखी पत्रानुसार, शाळ...

आगामी काळात धो-धो पाऊस पडू दे- हर्षवर्धन पाटील-नंदिकेश्वर चरणी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे साकडे

इंदापूर : प्रतिनिधी दि.24/8/26                                इंदापूर तालुक्याबरोबरच राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने प्रदीर्घ काळ दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम व वर्ष सुजलाम सुफलाम जाणेसाठी आगामी काळात धो धो पाऊस पडू दे, असे श्री नंदिकेश्वर चरणी साकडे घातल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 24) दिली.    इंदापूर तालुक्यातील निरवांगी नजीक दगडवाडी येथील नीरा नदीच्या काठी वसलेल्या प्राचीनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरामध्ये  हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांनी सोमवारी (दि.24) विधिवत पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.     यावेळी आगमन प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिशबाजीमध...

सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा भरणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या कडून जिल्हा परिषदेच्या पाच शाळेला 80व्या स्वतंत्र दिना निमित्त 300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इंदापूर सरडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा भरणे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या कडून जिल्हा परिषदेच्या पाच शाळेला 80व्या स्वतंत्र दिना निमित्त 300 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी चित्तरंजन आबा पाटील, मोहन बापू सरडे, सामाजिक कार्यकर्ते गणपत (नानासाहेब) सरडे, श्रीरंग दादा गायकवाड, बाळासाहेब जाधव, खंडू तात्या शिद, दगडु तात्या शिद,सर्जिराव कोळेकर साहेब,नानासाहेब हरणावळ, अभिमान तोबरे, सरपंच सौ. सुप्रिया कोळेकर, उप सरपंच सौ गयाबाई तोबरे, मा. उपसरपंच हनुमंत जमदाडे, निकिता पाटील, पृथ्वीराज पाटील,गोकुळ कोकरे,मा. सरपंच देविदास कडाळे, चंद्रकांत तोबरे, ग्रामसेवक गुलाबराव जगताप, पोपटराव तोबरे, अच्युतराव तोबरे, कुलदीप तोबरे, माऊली कोळेकर, उमेश तोबरे, शहाजी तोबरे, समाधान शिंदे, केशव गायकवाड, गणेश गायकवाड, सुरेश भगत, नामदेव तोबरे, राहुल चित्राव,नवनाथ नायकुडे,कुशाबा रांजवण,अजित शिद, अमोल शिद, अतुल ढावरे, गणेश दंडेल, सचिन उत्तेकर, महादेव जानकर, बापूराव जमदाडे, अमोल जमदाडे, संदिप जमदाडे, भाऊसाहेब गायकवाड,श्रीकांत तो...

उजनी धरणावरील सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीच्या खासगीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक;

१२ ऑगस्टला सोलापूर सिंचन भवनावर धडक मोर्चाचा इशारा उजनी धरणावर उभारण्यात येणारा प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि मत्स्य व्यवसायाचे खासगीकरण करण्याचे शासकीय धोरण मच्छिमारांच्या मुळावर उठले आहे. हे दोन्ही निर्णय तातडीने मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती’च्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना भरणेवाडी येथे एक विशेष निवेदन सुपूर्द करण्यात आले. प्रशासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक पाऊल न उचलल्यास येत्या १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील सिंचन भवनावर भव्य जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.           उजनी धरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारीचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. या धरणाच्या पाण्यावर आणि मत्स्य व्यवसायावर हजारो स्थानिक मच्छिमार, व्यावसायिक व छोटे व्यापारी यांच्या चुली पेटतात. जलसंपदा विभागाने या धरणातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर १,००० मेगावॅट क्षमतेचा ‘फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट’ (तरंगता सौर प्रकल्प) उभारण्याचे नियोजन केले आहे. सुमारे १४,५७६ कोट...