मुख्य सामग्रीवर वगळा

उजनी धरणावरील सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीच्या खासगीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक;


उजनी धरणावर उभारण्यात येणारा प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि मत्स्य व्यवसायाचे खासगीकरण करण्याचे शासकीय धोरण मच्छिमारांच्या मुळावर उठले आहे. हे दोन्ही निर्णय तातडीने मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती’च्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना भरणेवाडी येथे एक विशेष निवेदन सुपूर्द करण्यात आले. प्रशासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक पाऊल न उचलल्यास येत्या १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील सिंचन भवनावर भव्य जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
          उजनी धरण हे संपूर्ण महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मासेमारीचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. या धरणाच्या पाण्यावर आणि मत्स्य व्यवसायावर हजारो स्थानिक मच्छिमार, व्यावसायिक व छोटे व्यापारी यांच्या चुली पेटतात. जलसंपदा विभागाने या धरणातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर १,००० मेगावॅट क्षमतेचा ‘फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट’ (तरंगता सौर प्रकल्प) उभारण्याचे नियोजन केले आहे. सुमारे १४,५७६ कोटी रुपयांच्या या अवाढव्य प्रकल्पामुळे धरणाचा मोठा जलस्तर पॅनेलने झाकला जाणार आहे. परिणामी, पारंपारिक मासेमारीचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात घटून स्थानिकांचा हक्काचा रोजगार कायमस्वरूपी हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
       कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सौर पॅनेल्स बसवल्यामुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, पाण्यावर निर्माण होणाऱ्या सावलीमुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचणार नाही, ज्यामुळे नैसर्गिकरीत्या होणारी माशांची पैदास थांबून पाण्याचे प्रदूषण अतोनात वाढेल.
**खासगी कंत्राटदारीमुळे मच्छिमारात तीव्र असंतोष**
जलसंपदा विभागाने ई-टेंडर प्रक्रियेची चाचपणी करत मासेमारीचा ठेका खासगी भांडवलदारांच्या हाती सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या ई-टेंडर धोरणामुळे पारंपरिक मच्छिमार समाज हवालदील झाला असून त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण उजनी पट्ट्यात मच्छिमारांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मच्छिमारांच्या व्यथा समजून घेतल्या. "मच्छिमार बांधवांच्या रोजगारावर कोणताही गदा येऊ दिली जाणार नाही. या प्रकरणी आपण वैयक्तिकरीत्या तातडीने लक्ष घालून जलसंपदा व संबंधित विभागाशी चर्चा करू आणि यावर योग्य तो तोडगा काढू," असे सकारात्मक आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
दरम्यान, शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास १२ ऑगस्ट रोजी सोलापूर येथील मुख्य अभियंता, सिंचन भवन कार्यालयावर हजारोंच्या संख्येने एकत्र येत तीव्र निदर्शने केली जातील, असा निर्धार मच्छिमार पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...