मुख्य सामग्रीवर वगळा

आगामी काळात धो-धो पाऊस पडू दे- हर्षवर्धन पाटील-नंदिकेश्वर चरणी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे साकडे


इंदापूर : प्रतिनिधी दि.24/8/26
                               इंदापूर तालुक्याबरोबरच राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने प्रदीर्घ काळ दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम व वर्ष सुजलाम सुफलाम जाणेसाठी आगामी काळात धो धो पाऊस पडू दे, असे श्री नंदिकेश्वर चरणी साकडे घातल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 24) दिली.
   इंदापूर तालुक्यातील निरवांगी नजीक दगडवाडी येथील नीरा नदीच्या काठी वसलेल्या प्राचीनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरामध्ये  हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांनी सोमवारी (दि.24) विधिवत पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. 
   यावेळी आगमन प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये स्वागत केले. त्यानंतर मंदिरामध्ये हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक, आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे पौरहित्य विठ्ठल गुरव यांनी केले.
   हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात नंदिकेश्वर देवस्थान बरोबरच इतर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मंदिर परिसरांचा विकास होऊ शकला. नंदिकेश्वर मंदिराचे शिखराचे काम झाले असून आता मंदिराचे प्राचीनकालीन दगड फिनिशिंग व जीर्णोद्धाराचे उर्वरित काम पूर्ण केले जाईल.
   ते पुढे म्हणाले, सध्या पुरेशा पावसाअभावी असून खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. सध्या निरा व भिमा नद्या पाण्याने वाहत असल्या तरीही जर आपलेकडे पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र नदीपात्रातील पाणी हे जास्त दिवस टिकणार नाही. नंदिकेश्वर देवस्थान हे इंदापूर तालुक्यात वैभव असून जागृत देवस्थान आहे. त्यामुळे नंदिकेश्वराच्या आशीर्वादाने आगामी काळात समाधानकारक पाऊस पडेल, असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुका शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून, तालुक्यातील युवक हे शिक्षणाच्या व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची शिखरे पदांक्रांत करीत असल्याचे गौरवोदगारही त्यांनी काढले.
    याप्रसंगी दत्तात्रय पोळ, मनोज निंबाळकर, वीरसिंह रणसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, जयकुमार कारंडे, मनोज पाटील, दत्तू सवासे, अमरदीप काळकुटे, दत्तात्रय पोळ, राजकुमार जाधव, राजेंद्र देवकर, महावीर गांधी, हरिभाऊ बागल, अनिल बोन्द्रे, रामचंद्र नाईक, धनंजय कोरटकर, रामदास रासकर, दयानंद गायकवाड, गोविंद रणवरे ,गुलाबराव पोळ, भागवत गोरे, भाऊसाहेब काळकुटे, राजेंद्र कोरटकर, संदीप धनवडे, निवृत्ती शिंदे, राजाराम सूळ, युवराज रणमोडे, शंकर शेंडे, मारुती रासकर, अजिनाथ कांबळे, महादेव कवितके, दादा काळे तसेच चित्ररेखा कोरटकर, संगीता पोळ, कल्पना शिंदे, निरवांगी सरपंच सुरेखा गुरव, दगडवाडी सरपंच सुशीला रासकर आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू रोकडे यांनी केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे हस्ते मंदिर परिसरामध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
•चौकट:-
-------------------------------
निरा भिमा कारखाना कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे व भिमेवरील भाटनिमगाव, टणु, शेवरे हे बंधारे अडविण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये किमान मे पर्यंत तरी पाणीसाठा उपलब्ध राहून शेतकऱ्यांचा फायदा होईल, हा  शेतकऱ्यांसाठीचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...