इंदापूर शहराच्या नियोजनबध्द पारदर्शक व सर्वागीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणार दि. २७/०२/२०२६ रोजी इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या वेळी नगराध्यक्ष श्री भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ श्री. बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते श्री अनिल पवार व सर्व सदस्य तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष श्री. भरतशेठ शहा यांनी आपले मनोगत मांडताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, हरित उपक्रम डिजिटल प्रशासन, उत्पन्न् वाढ यास अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी, श्री रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी अपेक्षीत उत्पन्न स्रोत व विकास कामांचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती दिली. इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेने सन 2025-26 या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. कोणतीह...
SHIVSRUSTHI NEWS