मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकरी संकटात असताना कर्ज वसुलीसाठी तगादा नको; फायनान्स कंपन्यांना कृषीमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश**दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी*

इंदापूर : “शेतकरी शेतातच उध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणींचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी वाहने व इतर कुठल्याही स्वरुपाच्या कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये.,” असे स्पष्ट निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
बुलढाणा जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या वसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याबाबत शासनाने कारवाई केली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. फायनान्स कंपन्यांचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून यावर योग्य तो मार्ग काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील लावंड वस्तीवर शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी भेट देत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला तसेच जनावरे व शेळ्यांच्या गोठ्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीचे पंचनामे आणि पाणी उपलब्धतेच्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला.
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अग्रिम मदतीबाबत बोलताना भरणे म्हणाले की, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर केल्यामुळे आतापर्यंत ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना प्रति ५ हजार रुपयांप्रमाणे ४ हजार ३७२ कोटी रुपयांची अग्रिम मदत देता आली. उर्वरित शेतकऱ्यांना देखील पुढील दोन-तीन दिवसांमध्ये मदत दिली जाईल. ही केवळ अग्रिम मदत असून यापुढेही शासनाकडून मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांमध्येही भरीव वाढ केली आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

नीरा नदी व कालव्यांतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी रास्त असून याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

*२० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी*
कर्जमाफीबाबत बोलताना कृषीमंत्री म्हणाले, आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये २० लाख ७२ हजार २५० शेतकऱ्यांना तब्बल १८ हजार ४० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सोबतच दोन लाखांपर्यंतच्या कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेततळी, गाळ काढणे, मोफत बियाणे आणि वीजबिल सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरू असून या सर्व योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...

चलो हिंगणगाव!" उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न? उद्या प्रशासनाविरुद्ध एल्गार!

इंदापूर/हिंगणगाव उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर प्रशासनाकडून बळजबरीने ताबा मिळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत, उद्या हिंगणगाव येथे शेतकरी एकत्र येऊन प्रशासकीय हुकूमशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारणार आहेत. " शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, एकजुटीची ताकद!" या घोषणेसह उद्या, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता हिंगणगाव येथील 'मच्छबीज केंद्र' येथे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, हुकूमशाही पद्धतीने आणि प्रशासनाचा वापर करून बळजबरीने मोजणी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "पिढ्यानपिढ्या ज्या जमिनींवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्या जमिनी प्रशासन सालगड्यासारखा वापर करून हिरावून घेऊ पाहत आहे," असा संताप आंदोलक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध हिं...