वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
सामाजिक, सांस्कृतिक आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात वाचकांच्या पसंतीस उतरत असलेल्या 'साप्ताहिक भगवा प्रांत' तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल यांसह भारतीय पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे देखील उद्घाटन पुण्यातील महम्मदवाडी येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर नगरसेवक प्रशांत तुपे यांसह छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आखाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाचा हा सोहळा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार आणि वाचकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या वंदनेने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते कार्यालयाचे नामफलक अनावरण व फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
या दरम्यान बोलताना प्रमुख पाहुण्यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज तसेच'साप्ताहिक भगवा प्रांत' वृत्तपत्राच्या आतापर्यंतच्या प्रवासाचे कौतुक केले. "लोकांच्या समस्यांना वाचा फोडणे, सत्य आणि निष्पक्ष पत्रकारिता करणे ही काळाची गरज असून 'भगवा प्रांत' ही गरज उत्तम प्रकारे भागवत असल्याचा विश्वास देखील मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
यावेळी वृत्तपत्राचे संपादक आणि कार्यालयीन प्रमुख उमेश काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की, "वाचकांच्या प्रेम आणि सहकार्यामुळेच आज महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल व साप्ताहिक भगवा प्रांतचा विस्तार होत आहे. लोकांपर्यंत अचूक आणि ज्वलंत विचार पोहोचवण्यासाठी हे कार्यालय एक हक्काचे केंद्र बनेल."
याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ महासचिव रमेश गणगे प्रदेश संघटक अनिल सोनवणे लीगल विंगचे योगेश तुपे पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख सातारा जिल्हाध्यक्ष विकास शिंदे ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांसह मानवाधिकार संघटनेचे अतुल कुंजीर शेतकरी संघटनेच्या सुरेखा जाधव सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कदम विनायक रायकर शीतल मोरे सागर पणपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या