मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापुरात गुटख्याचा 'दिवाळी धमाका': एफडीए झोपेत, पोलिसांचे 'लाडके पंटर' थेट ठाण्यातच तैनात; रस्त्यांवर मात्र रंगीबेरंगी 'चित्रकला'!


इंदापूर: इंदापूर तालुक्यात सध्या एका नव्याच कलेला उधाण आलं आहे! शहर असो वा ग्रामीण भाग, रस्त्या-रस्त्यावर, भिंतींवर आणि चौकाचौकांत तांबड्या-लाल रंगाच्या अशा काही 'पिचकाऱ्या' मारल्या जात आहेत की, परदेशी चित्रकारही ही रंगीबेरंगी 'आर्ट' पाहून चक्रावून जातील! अपवादात्मक दोन-चार कोपरे सोडले, तर संपूर्ण तालुक्यात गुटख्याची विक्री अगदी खुलेआम, दिमाखात आणि ढोल-ताशांच्या गजरासारखी सुरू आहे. पण, समाजसुधारणेच्या आणि धडक कारवाईच्या बाता मारणारे एफडीए खाते (आणि त्यांचे प्रमुख तुकाराम मुंढे साहेब) नेमके कुठल्या गाढ झोपेत आहेत, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

‘गोतामे’ फुल्ल अन् दिवाळी धमाका! सध्या सण-उत्सवाचे दिवस नसले तरी इंदापुरातील गुटखा माफियांसाठी रोजच 'दिवाळी धमाका' सुरू आहे. गुटख्याचे गोडाऊन म्हणजेच 'गोतामे' काठोकाठ भरून वाहत आहेत. सरकारबंदीचा कागदी वाघ दाखवला जातोय, पण प्रत्यक्षात मात्र "खिशाला द्या मलिदा, अन् गुटखा न्या फायदा" असाच काहीसा कारभार सुरू आहे.

पोलीस अन् 'पंटर': हे नातं काय म्हणायचं? सर्वात रंजक आणि चकीत करणारी गोष्ट म्हणजे इंदापुरात गुटखा विकणारे प्रमुख व्यापारी आणि त्यांचे चमचे (पंटर) नेहमीच पोलीस ठाण्याच्या आवारात रेंगाळताना दिसतात. साध्या माणसाला तक्रार द्यायला गेलो तरी शंभर प्रश्न विचारले जातात, पण या 'गुटखा पंटरांना' मात्र पोलीस ठाण्यात इतका हक्काचा प्रवेश असतो, की ते तिथले दलाल आहेत की काय, असा संशय यावा! "आम्ही पोलिसांचे जवळचे," असा रुबाब दाखवत हे पंटर शहरात उजळ माथ्याने गुटख्याची साखळी चालवत आहेत.

आता 'त्या' पिचकाऱ्या बंद कधी होणार? गुटखा खाणारे महाभाग कुठेही तोंडातला पिचकारा मारतात. सरकारी इमारती, सार्वजनिक चौक आणि स्वच्छ रस्ते यांच्यावर या 'तांबड्या क्रांती'चे डाग उठले आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेच्या नावाने पूज्य बाबाजीचा भोपळा उरला आहे.

कारवाया पुरत्या थंडावल्या आहेत. एफडीएची पथके इंदापूरच्या वेशीवर कधी पाऊल ठेवणार? की एफडीएचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन फक्त हप्ते आणि 'सेटिंग'चे कागद रंगवण्यातच व्यस्त राहणार?

नागरिकांचा एकच सवाल: इंदापूरकरांना आता या प्रशासकीय ढोंगाचा पुरता विट आला आहे. एफडीए आणि पोलीस खाते खरोखरच जागे होऊन या दलालांवर धडक कारवाई करणार, की इंदापूरच्या रस्त्यांवर अशीच रंगीत पिचकाऱ्यांची 'कलाप्रदर्शने' नित्यनेमाने पाहायला मिळणार? एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे साहेब, आता तरी या 'निद्रिस्त' खात्याला जरा जणझणीत डोस पाजा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...

चलो हिंगणगाव!" उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न? उद्या प्रशासनाविरुद्ध एल्गार!

इंदापूर/हिंगणगाव उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर प्रशासनाकडून बळजबरीने ताबा मिळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत, उद्या हिंगणगाव येथे शेतकरी एकत्र येऊन प्रशासकीय हुकूमशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारणार आहेत. " शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, एकजुटीची ताकद!" या घोषणेसह उद्या, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता हिंगणगाव येथील 'मच्छबीज केंद्र' येथे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, हुकूमशाही पद्धतीने आणि प्रशासनाचा वापर करून बळजबरीने मोजणी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "पिढ्यानपिढ्या ज्या जमिनींवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्या जमिनी प्रशासन सालगड्यासारखा वापर करून हिरावून घेऊ पाहत आहे," असा संताप आंदोलक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध हिं...