मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॉट्रक्ट बेसवर काम करणा-या नगरपरिषद कर्मचार-यांना नोकरीत कायम करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निवेदन

इंदापूर:- आपल्या इंदापूर नगरपरिषदेचे गेल्या अनेक वर्षापासुन काम करत आहेत. आम्ही कॉट्रक्ट बेसवर काम करत असुन मागील १५ वर्षापासुन आम्ही परमनंट होण्याची वाट पाहत आहोत. ऐवढी वर्ष प्रमाणीक पणे काम केले आहे हे सर्वानी पाहिलेले आहे. इंदापूर नगरपरिषदेला मिळालेल्या स्वच्छतेच्या पुरस्कारामध्ये आमचे योगदान अतुलनिय आहे. इंदापूरच्या स्वच्छतेसाठी आम्ही फार कष्ट घेतले आहेत. वाढत्या महागाईमुळे सदर कॉट्रक्ट बेसवर मिळणा-या पगारामध्ये आमचे घरखर्च भागत नाही. त्यामुळे आम्हाला कायम करण्याची कार्यवाही होईपर्यंत प्रतिदिवस ५०० रूपये या प्रमाणे पगार मिळावा अशी आमची मागणी आहे. आम्हाला इंदापूर नगरपरिषदेमध्ये कायम करून येथुन पुढे अखंडीत आपली सेवा करण्याची संधी द्यावी आसे निवेदन . मा.मुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री साो. महाराष्ट्र राज्य,मा. दत्तात्रय भरणे साो. कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य,मा. भरतशेठ शहा, नगराध्यक्ष इंदापूर नगरपालिका यांना देण्यात आले,या निवेदनावर एकूण तीस कामगारांच्या सह्या आहेत, हे निवेदन मुख्याधिकारी यांच्यानावाने देण्यात आल...

इंदापूरात ३१ डिसेंबरला दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम

देशातील युवा पिढी व्यसनमुक्त व सामर्थ्यवान बनावी या उदात्त हेतूने जेष्ठ किर्तनकार युवक मित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सलग १५व्या वर्षी विधायक ३१ डिसेंबर-दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.        यावेळी इंदापूर शहर आणि परिसरातील गलांडवाडी, वरकुटे,वडापुरी, नरुटवाडी त्याच बरोबर इतर गावातील ५५० युवक व नागरीकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना लोणी देवकर येथील रचना देशी गो संवर्धन केंद्र यांच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले तसेच गलांडवाडी नं१येथील राजीवप्रताप निसर्गोपचार केंद्राचे संचालक प्रताप कदम यांच्या वतीने व्यसनमुक्त युवक संघाची शिवतेज दिनदर्शिका मान्यवरांना भेट देण्यात आली.      कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शेठ शहा म्हणाले 'घरातील, समाजातील ज्येष्ठांचे अनुकरण करत शालेय मुलंही व्यसनाच्या आहारी जात आहेत म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. कोणत्याही देशाची ...