मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अनंतराव थोपटे यांच्या निधनाने ऋषीतुल्य नेतृत्व हरपले- हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि.5/6/26                                     राज्यातील जेष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनाने समाजाला दिशा देणारे, आदर्श मूल्ये जपणारे व जनहितासाठी आयुष्य वेचणारे अभ्यासू नेतृत्व आता आपल्यामध्ये राहिलेले नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ऋषीतुल्य नेतृत्व गमावले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.          अनंतराव थोपटे साहेबांनी आयुष्यभर लोकाभिमुख आणि मूल्याधिष्ठित असे राजकारण, समाजकारण केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण केले. भोर तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी कायम असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि लोकहिताची तळमळ ही त्यांची खरी ओळख होती, असे हर्षवर्धन ...

कारखाना चालतोय 'सहकारा'वर, शेतकरी जगतोय 'उधारी'वर..! पाटलांच्या 'कर्मयोगीला' लागला थकीत बिलांचा डाग.; शेतकरी आक्रमक!

इंदापूर:- एकेकाळी सहकार क्षेत्रात आदर्श मानला जाणाऱ्या इंदापूरच्या 'कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्या'च्या नावाला आज ग्रहण लागले आहे. कर्मयोगी शंकरराव भाऊ पाटील आणि गोकुळदास भाई शहा यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजनाने जो कारखाना शेतकऱ्यांचा 'आधारस्तंभ' बनवला होता, त्याच कारखान्यात आज शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत; घामाचे दाम अडकले एक काळ असा होता की, कारखान्याच्या गेटमधून ऊस गेला की काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. 'शेतकरी सुखी तरच कारखाना सुखी' हे ब्रीदवाक्य या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले होते. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. कारखान्याचे सूत्रे बाबुराव बोत्रे यांच्या हाती सोपवल्यापासून शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ हतबलता आली आहे. ऊस देऊन पाच-सहा महिने उलटले, तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळालेले नाहीत. भाऊ-भाई'च्या सुवर्णकाळाची आज आठवण   मा.ना.हर्षवर्धनभाऊ पाटील आणि मा.भरतभाऊ शहा यांच्या काळात कारख...

इंदापूर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध : नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

स्वच्छ सर्वेक्षण २०२६' आणि 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर परिसर नगरपरिषदेकडून चकाचक इंदापूर :- शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मिशन लाईफ' आणि राज्य सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील व्यंकटेशनगर परिसरात आयोजित विशेष 'स्वच्छता मोहिमेच्या' प्रसंगी ते बोलत होते. या पालिकेने शहराला देशपातळीवर आघाडीवर नेण्यासाठी हे कंबरकसून नियोजन केले आहे. इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये, स्वच्छ इंदापूर ! सुंदर इंदापूर !! हरित इंदापूर !!!"या त्रिसूत्री संकल्पनेतून विविध प्रभागांमध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यंकटेश नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान श्री बालाजी मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, शिकलक...

तालुक्यातील 'सहकार सम्राटाचा' माज मोडूनच काढणार..! मयूरसिंह पाटलांच्या व्हाट्सॲप स्टेटसने इंदापुरात खळबळ

इंदापूर :राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण सध्या इंदापूर तालुक्यात नेत्यांच्या भाषणांपेक्षा त्यांच्या 'व्हाट्सॲप स्टेटस'चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी आपल्या व्हाट्सॲपवर ठेवलेल्या एका स्टेटसने सध्या इंदापूरच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये चांगलाच उन्हाळा वाढवला आहे.मयूरसिंह पाटील यांनी आपल्या स्टेटसवर भगव्या बॅकग्राउंडवर थेट आणि धारदार शब्दांत लिहिलंय"तालुक्यातील सहकार सम्राटाचा माज मोडूनच काढणार..!केवळ एका ओळीच्या या स्टेटसने तालुक्याच्या राजकारणात 'न भूतो न भविष्यती' असा भूकंप आणला आहे. अवघ्या काही मिनिटांतच या स्टेटसचे स्क्रीनशॉट संपूर्ण इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.मयूरसिंह पाटील यांनी थेट नाव न घेता 'सहकार सम्राट' असा उल्लेख केल्यामुळे आता हा बाण नक्की कोणाच्या दिशेने सुटलाय, यावर चौकाचौकांत पैजा लागल्या आहेत. तालुक्यात सहकार क्षेत्रावर वर्चस्व असणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला मयूरसिंह यांनी हा थेट इशारा दिला आहे? आणि हा 'माज' नक्की कसा मोडला जाणा...

*पंतप्रधानांच्या 'हरित वाहतूक' आवाहनाला राजवर्धन पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद; पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू!

 इंदापूर  देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इंदापूरचे युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. "हरित वाहतूक"आणि इंधन बचतीच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक वाहन  दाखल केले असून, आजपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि पारंपारिक इंधनाचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतलेला हा निर्णय सध्या मतदारसंघात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.याप्रसंगी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे जगभरात आता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील एका अग्रगण्य युवा ...

इंदापुरात ‘स्क्रिप्टेड गुन्हेगारी’चा महाधमाका! "तक्रारी तयार करा, गुन्हे लावा आणि वसुली करा"; कोर्टाच्या आदेशाने ‘खाकी’ आणि ‘झारीतील शुक्राचार्यांचे’ धाबे दणाणले!

*इंदापूर (विशेष प्रतिनिधी): चित्रपटात दिग्दर्शक जशी स्क्रिप्ट लिहितो, तशीच काहीशी 'क्राईम स्क्रिप्ट' इंदापुरात लिहिली जात असल्याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे! प्रतिष्ठित नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवायचे, पुरावे प्लांट करायचे आणि मग दबावाचे राजकारण करायचे... असा हा इंदापूर पॅटर्न! पण म्हणतात ना, "कायद्याचे हात लांब असतात", अखेर इंदापूर न्यायालयाने या ‘स्क्रिप्टेड’ प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांच्या चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. चं. बारटक्के यांनी दिलेल्या या दणक्यामुळे इंदापूरच्या पोलीस वर्तुळात आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कथा २०१८ पासून सुरू होते. इंदापूर शहरातील नामांकित क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक गोरख भोसले यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विडाच जणू तत्कालीन एपीआय महेंद्र निंबाळकर यांनी उचलला होता. यासाठी त्यांनी औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अव्वल कारकून 'झेंडे' यांना व्हॉट्सअॅप...

पुणे-सोलापूर हायवेवर 'पाणी वाहून जाण्यासाठी आसणारे,, ; ढाबेवाले अन् हॉटेलचालकांनी साईट गटारेच गिळली

इंदापूर,:- पावसाळा तोंडावर आला की शासकीय पातळीवर नालेसफाई आणि पाणी वाहून जाण्यासाठी 'पावसाळापूर्व कामांची' लगबग सुरू होते. पण पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या भलताच 'सांस्कृतिक आणि व्यापारी' प्रयोग पाहायला मिळतोय. महामार्गावरून पाणी सुसाट वाहून जावे म्हणून काढलेल्या साईड चाऱ्या (गटारे) महाभागांनी चक्क गायब केल्या आहेत. होय, गायब! रस्ता कडेच्या काही अपवादात्मक ढाबेवाल्यांनी, पेट्रोल पंप मालकांनी आणि हॉटेलचालकांनी आपल्या ग्राहकांच्या गाड्या आरामात लागाव्यात म्हणून या चाऱ्यांवर चक्क माती आणि मुरूम टाकून त्या बुजवून टाकल्या आहेत. आता हॉटेलमध्ये 'स्पेशल मटण थाळी' किंवा 'चिकन हंडी' ओरपायला येणाऱ्या गिऱ्हाइकांना गटारावरून उडी मारत कसं आणणार? हा विचार करून या चालकांनी 'आपला विकास, हायवेचा विनाश' हे धोरण राबवलेलं दिसतंय. पण यामुळे येत्या पावसाळ्यात महामार्गावर 'जलतरण तलाव' तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये! या गंभीर प्रकाराची दखल सरडेवाडी टोलनाक्यावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी...