मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ग्रामविकास कृषी जिल्हा स्तरीय कृषि व औद्योगिक प्रदर्शन २०२२ दि.23  ते 27 नोव्हेंबर,रोजी-सिमाताई कल्याणकर इंदापूर:- 10 वे ग्रामविकास कृषी प्रदर्शन इंदापूर तालुका, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले स्थान सधन,शेतकरी, सोलापूर, नगर, पुणे, सातारा या चारही जिल्ह्यांना जवळ असणारे, ग्रामीण व शहरी संस्कृतीची अपूर्व संगम, भरभराटीची कृषि औद्योगिक बाजारपेठ,सहकार चळवळीतून साधलेले समृद्ध औद्योगिकरण, येथील व्यवहारीक हुशार शेतकरी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी आतुर असलेला तरुण वर्ग,राजकिय, सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे भान असलेला नागरीक ग्रामविकास कृषि या प्रदर्शनाचे स्वागत उत्सुकतेने करत आहे. सुमारे २ लाख लोकांची या प्रदर्शनास भेट अपेक्षित आहे. त्यामुळे  10 वे कृषि प्रदर्शन हे एक उत्तम व्यासपीठ मिळवून देणार यात कोणतीही शंका नाही. येथील शेतकऱ्याशी आपला थेट होणारा संवाद या निमित्ताने साधत आहोत. विकासधारा मंच  ही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार, व्यावसायिक,प्रशिक्षण आदी क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत आहे. ग्र...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

तरंगवाडीच्या सरपंचपदी दिपाली महादेव वाघमोडे यांची बिनविरोध निवड   इंदापूर:-  तालुक्यातील तरंगवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी दिपाली महादेव वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कान्होपात्रा जाधव यांनी सरपंच पदाच्या राजीनामा दिलेमुळे सदर जागा रिक्त झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन करगळ यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच कांतीलाल तरंगे सदस्य सविता कांतीलाल बुणगे, कान्होपात्रा गोविंद जाधव, स्वाती तुकाराम करे, मुक्ता यशवंत यशवंत तरंगे, चैत्राली अण्णासाहेब तरंगे, आप्पासाहेब तात्याराम शिंदे सदस्य तसेच ग्रामसेवक दादासाहेब वाघ उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच दिपाली वाघमोडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने यशवंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत तरंगे,विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चितळकर, माजी सरपंच बबन बुटे,अजिनाथ तरंगे यांनी सत्कार केला.निवडीनंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सरपंच दिपाली वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

लेकीच्या वाढदिवसानिमित्त आईचे शुभेच्छापत्र  विशु वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा माझी लाडकी लेक विश्र्वबाला किती गुणवंत, बुद्धिवंत, कीर्तिवंत आणि समंजस आहे  हे लिहीत असतांना शब्द अपुरे पडत आहेत ....तुझ्या जन्मापासून ते आज पर्यंत अनमोल आठवणी  माझ्या हृदयात आहेत.   माझी विश्र्वबाला  चिमुकल्या पाउलांनी जीवनात आली आणि चिमुकली बाहुली केंव्हा मोठी झाली ते समजले नाही. तुझे अस्तित्व, प्रेम आणि विश्वास आमचे जग आहे...तूच आमचं विश्व आहेस ! ... तू खुप लहान असून देखील अनेकदा मला समजावून सांगते तेव्हां वाटते तू मनाने आणि मानाने खुप मोठी आहे. तुझे बोल मन हलके करतात .... तुझ्या जन्माने दुःख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरले. उत्तुंग आकाशाला गवसणी घालण्याची तुझी जिद्द आणि आत्मविश्र्वास हा स्वप्नाला देखील सत्यात उतरवित आहे, तु इंजिनिअर होऊन आय टी क्षेत्रात अभियंता म्हणून सहा महिन्यापूर्वी नामांकित कंपनीत कार्यरत झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे, आयुष्यामध्ये खुप पैसा कमवित असतान...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

माझ्या जनसामान्य जनतेला सुखी ठेवा, म्हणून भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांनी घातले बाबीर देवाला साकडं  इंदापूर:- माझा शेतकरी, गोरगरीब,जनसामान्य जनतेला सुखी ठेवा, त्यांना अर्थिक,आरोग्य स्थैर्य प्राप्त होवो, कोणतेही संकट येऊ देऊ नका, म्हणून भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांनी घातले रूई येथील श्री.क्षेत्र बाबीर देवाला घातले साकडं, त्यांनी शेकडो कार्यकर्त्या समवेत दर्शन घेऊन जनतेने प्रशासनाला व प्रशासनाकडून जनतेला सहकार्य करावे व यात्रा आनंदात पार पाडावी आसे आवाहन केले, या कार्यक्रमास जेष्ठ भाजप नेते बाबासाहेब चवरे,  सरपंच आकाश कांबळे, विचार मंथन ग्रुप अॅडमिन प्रकाश पवार,शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर पाटील,सिमाताई कल्याणकर, सह इतर मान्यवर उपस्थित होते,  या वेळेस रक्तदान शिबीराचे उद्घाटन पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते पार पडले, जंक्शन पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक साळुंखे, विनोद पवार, इतर मान्यवर उपस्थित होते,  राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रुई (ता. इंदापूर) येथी...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महाराष्ट्र राज्य बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धा शिव शंभो येथे संपन्न,उद्घाटन माजी सहकार मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न  इंदापूर:- महाराष्ट्र राज्य बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धा शिव शंभो कार्यालय आयोजित करण्यात आली यांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.महारुद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ,निलेश देवकर रयत क्रांती शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पळसदेव माजी सरपंच ,गोरख शिंदे माजी नगरसेवक, चित्तरंजन पाटील उद्योजक, मेघशाम पाटील मार्केट कमिटी संचालक, शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, वसंत आरडे, तालुका समन्वयक अरुण पवार कर्मयोगी कारखाना संचालक प्रवीण देवकर ,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील सुरेश बापू शिंदे श्री संजय सरदेसाई सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन एडवोकेट रवींद्र यादव सचिव महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन अनंत चाळके पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत गर्दे उपस्थित होते, स्पर्धेमध्ये ४०५ पुरुष खेळाडू व १७५ महिला ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी -लेखक महादेव चव्हाण इंदापूर:- भारतरत्न डॉक्टर ए .पी .जे.  अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जूनियर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत लेखक महादेव चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले. ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या निमित्ताने वाचनाचे महत्त्व पटवून देताना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले. पुस्तके तुम्हाला जगायला शिकवतात त्यामुळे पुस्तकाच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवला पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.  थोर शास्त्रज्ञ, भारत देशाचे राष्ट्रपती, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य किती महान होते हे सांगितले.वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचन करावे म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास यातूनच होईल.  विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, पर्यवेक्षक विजय शिंदे, लेखक महादेव चव्हाण, हमीदभाई आ...

हर्षवर्धन पाटील यांनी नंदिकेश्वर मंदिरात अनुभवला श्रीमहाकाल नवनिर्माण लोकार्पण लाईव्ह सोहळा!

हर्षवर्धन पाटील यांनी नंदिकेश्वर मंदिरात अनुभवला श्रीमहाकाल नवनिर्माण लोकार्पण लाईव्ह सोहळा!  - निरवांगी नजीक दगडवाडी येथे शेकडो नागरिकांची उपस्थिती   - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथे  सोहळा संपन्न! इंदापूर: प्रतिनिधी दि.11/10/22             भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरवांगी नजीक दगडवाडी येथील नंदिकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या स्क्रीन द्वारे उज्जैन येथील श्रीमहाकाल मंदिर नवनिर्माण ( कॅरिडोर ) लोकार्पण लाईव्ह सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.11) सायंकाळी अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमहाकाल लोक कॅरिडोर लोकार्पण सोहळा धार्मिक व उत्साही वातावरण संपन्न झाला.             उज्जैन ( मध्य प्रदेश) येथे 856 कोटी रुपये खर्च करून सुमारे 47 हेक्टर क्षेत्रावर महाकाल मंदिर काॅरिडोर उभारण्यात आला आहे. उज्जैन येथील श्रीमहाकालेश्वर मंदिर हे देशातील एक ऐतिहासिक व जागतिक प्रसिद्धी लाभलेले जोतिर्लिंग आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमू...