लेकीच्या वाढदिवसानिमित्त आईचे शुभेच्छापत्र
विशु वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
माझी लाडकी लेक विश्र्वबाला किती गुणवंत, बुद्धिवंत, कीर्तिवंत आणि समंजस आहे हे लिहीत असतांना शब्द अपुरे पडत आहेत ....तुझ्या
माझी विश्र्वबाला
चिमुकल्या पाउलांनी जीवनात आली आणि चिमुकली बाहुली केंव्हा मोठी झाली ते समजले नाही. तुझे अस्तित्व, प्रेम आणि विश्वास आमचे जग आहे...तूच आमचं विश्व आहेस ! ... तू खुप लहान असून देखील अनेकदा मला समजावून सांगते तेव्हां वाटते तू मनाने आणि मानाने खुप मोठी आहे. तुझे बोल मन हलके करतात ....
तुझ्या जन्माने दुःख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरले.
उत्तुंग आकाशाला गवसणी घालण्याची तुझी जिद्द आणि आत्मविश्र्वास हा स्वप्नाला देखील सत्यात उतरवित आहे, तु इंजिनिअर होऊन आय टी क्षेत्रात अभियंता म्हणून सहा महिन्यापूर्वी नामांकित कंपनीत कार्यरत झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे, आयुष्यामध्ये खुप पैसा कमवित असताना आपण समाजाचे देणं लागतो हे विसरू नको. गरीब, गुणवत्ताधारक,होतकरू विद्यार्थ्यांना मदत कर, महिला सबल -सशक्तीकरण बाबत काम कर. प्रामाणिकपणे मिळविलेले थोडसं धन, मूठभर अन्न आणि आनंदाचा क्षण समाजासाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपत आयुष्य खुप छान जगताना आपलं माणूस जप.
तुझी ओळख कर्तृत्वाने समाजासमोर यावी, तुझी श्रीमंती विचार, आचार आणि कार्यात असावी.
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य - आनंद राहावा ! माझ्या लाडक्या लेकीला यश, सुख- समृद्धी आणि उदंड आयुष्य लाभो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना
प्रा.डॉ.जयश्री भास्कर गटकुळ, इंदापूर
जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा
टिप्पण्या