माझ्या जनसामान्य जनतेला सुखी ठेवा, म्हणून भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांनी घातले बाबीर देवाला साकडं
इंदापूर:- माझा शेतकरी, गोरगरीब,जनसामान्य जनतेला सुखी ठेवा, त्यांना अर्थिक,आरोग्य स्थैर्य प्राप्त होवो, कोणतेही संकट येऊ देऊ नका, म्हणून भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांनी घातले रूई येथील श्री.क्षेत्र बाबीर देवाला घातले साकडं, त्यांनी शेकडो कार्यकर्त्या समवेत दर्शन घेऊन जनतेने प्रशासनाला व प्रशासनाकडून जनतेला सहकार्य करावे व यात्रा आनंदात पार पाडावी आसे आवाहन केले, या कार्यक्रमास जेष्ठ भाजप नेते बाबासाहेब चवरे,
सरपंच आकाश कांबळे, विचार मंथन ग्रुप अॅडमिन प्रकाश पवार,शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर पाटील,सिमाताई कल्याणकर, सह इतर मान्यवर उपस्थित होते,
या वेळेस रक्तदान शिबीराचे उद्घाटन पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते पार पडले, जंक्शन पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक साळुंखे, विनोद पवार, इतर मान्यवर उपस्थित होते,
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रुई (ता. इंदापूर) येथील श्री.बाबीर देवाच्या यात्रेस दिवाळी पाडव्यादिवशी सुरवात होणार आहे. श्री बाबीर देवाची यात्रा वर्षात दोन वेळेस भरते. परंतु, दिवाळी पाडव्याला भरणारी यात्रा ही प्रमुख यात्रा असते. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे यात्रा काळात भाविकांच्या सोईसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जाते. मंदिर परिसरात पालखी मिरवणूक, महापूजा, अभिषेक यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाबरोबर पारंपारिक गजीढोल स्पर्धा, कृषी प्रदर्शन, यात्रा बाजार, पाळणा, नवसाचे बगाड आदी कार्यक्रमांची रेलचेल असते..
टिप्पण्या