इंदापूर:- 10 वे ग्रामविकास कृषी प्रदर्शन
इंदापूर तालुका, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले स्थान सधन,शेतकरी, सोलापूर, नगर, पुणे, सातारा या चारही जिल्ह्यांना जवळ असणारे, ग्रामीण व शहरी संस्कृतीची अपूर्व संगम, भरभराटीची कृषि औद्योगिक बाजारपेठ,सहकार चळवळीतून साधलेले समृद्ध औद्योगिकरण, येथील व्यवहारीक हुशार
शेतकरी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन घेण्यासाठी आतुर असलेला तरुण वर्ग,राजकिय, सामाजिक जबाबदारी व कर्तव्याचे भान असलेला नागरीक ग्रामविकास कृषि या प्रदर्शनाचे स्वागत उत्सुकतेने करत आहे. सुमारे २ लाख लोकांची या
प्रदर्शनास भेट अपेक्षित आहे. त्यामुळे 10 वे कृषि प्रदर्शन हे एक उत्तम व्यासपीठ
मिळवून देणार यात कोणतीही शंका नाही. येथील शेतकऱ्याशी आपला थेट होणारा
संवाद या निमित्ताने साधत आहोत.
विकासधारा मंच ही सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार, व्यावसायिक,प्रशिक्षण आदी क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत
आहे. ग्रामविकास कृषी जिल्हा स्तरीय कृषि व औद्योगिक प्रदर्शन २०२२ दिनांक
23 ते 27 नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर, ता. इंदापूर , जि. पुणे महत्त्वकांक्षी
आयोजन करु पाहत आहे. या निमित्ताने परिसरातील शेतकऱ्यामध्ये नवतंत्रज्ञानाची
ओळख व्हावी. ही संकल्पना त्यामागे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषि
कल्याणकारी योजनांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर महिला
बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या प्रदर्शनात होणार
आहे. या हेतूने या प्रदर्शनाची संकल्पना मांडत आहे. भविष्यात असे अनेक विविध
समाज उपयोगी उपक्रमाची नांदी या निमित्ताने होत आहे.या उपक्रमास सुरुवात करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. यामध्ये,खाजगी संस्था, शासन, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांचा सहभाग लाभेल ही,अपेक्षा.या प्रदर्शनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.सीमा प्रशांत कल्याणकर अध्यक्ष विकासधारा मंच यांनी केले आहे,
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या