पीपल्स पब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने उजनी धरणावरील बेमुदत धरणे आंदोलनाला ९दिवस पुर्ण-संजय सोनवणे इंदापूर:-आंदोलनाचा आजचा 9 वा दिवस पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उजनी धरण तरटगाव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन संजय भैय्या सोनवणे यांनी सुरू केले आहे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या जमिनी येथील गाव गुंडांनी आणि धनदांडग्यांनी कसू दिल्या नाहीत त्या जमीनी दमदाटी करून खरेदी करून घेतल्या आणि धरणग्रस्तांना येथून हाकलून लावले त्या जमिनीच्या खरेदी रद्द करून त्या जमिनी परत धरणग्रस्तांना देण्यात यावे, मराठवाड्याचा महाकाय बोगदा बेकायदेशीररित्या चालू आहे तात्काळ त्याचं काम थांबावे मराठवाड्यासाठी 21 टीएमसी चेक केलेली तरतूद रद्द करावी या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन संजय भैया सोनवणे ,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या आंदोलनाचा आज ९वा दिवस आहे, आसेही संजय भैय्या सोनवणे म्हणाले,
SHIVSRUSTHI NEWS