मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर: दिनांक ०९/०६/२०२१ रोजी शिवशाही शेतकरी संघटना या संघटनेचे इंदापुर नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष मा.श्री.अरविंद(तात्या)वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नितीन दादा आरडे यांनी याप्रसंगी संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत माहिती दिली.  यावेळी पुणे जिल्हा आरपीआय संघटन सचिव शिवाजीराव मखरे, आर पी आयचे बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, आर पी आयचे इंदापूर तालुका अध्यक्ष संदिपान कडवळे सर,  समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण आरपीआयचे शहराध्यक्ष अमोल मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शिवशाही शेतकरी संघटना भूमिका

 आज संपूर्ण भारत देशातील शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. एका बाजूला अवर्षण अतिवृष्टी अस्मानी संकट तर दुसर्‍या बाजूला शासनाची शेतकरी विरोधी धोरणे यामुळे कृषिप्रधान असलेला देश अक्षरशः  कंगाल होण्याची वेळ आली आहे. 

शेतीवर आधारलेले उद्योगधंदे धनदांडग्या आणि जात दांडग्या जमातीने स्वतःच्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नागवले आहे. त्यांची लूट केली आहे व पुन्हा सहकारी संस्था कर्जबाजारी करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला शेतीचे कर्ज तर दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांचे कर्ज अशा कैची मध्ये आज महाराष्ट्रातील शेतकरी सापडलेला आहे.

 सत्तेच्या गाद्या उबवून सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची लूट करणारी यंत्रणा उभी करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सहकार आणि साखर सम्राटांनी केला.

 एफ आर पी व एम एस पी च्या बाबत शेतकऱ्यांनी कितीही पाठपुरावा केला तरी ह्या महाभागांनी कधीही त्यास दाद दिली नाही.
 सहकाराच्या सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता हे दुष्ट चक्र यांनी निर्माण करून सत्तेचा उपभोग घेतला व शेतकऱ्यांना भिकेला लावले.
 या पूर्वीपासून अनेक शेतकऱ्यांच्या संघटना कार्यरत आहेत. परंतु त्या शेतकऱ्यांचे हित कमी आणि कारखानदार भांडवलदारांचे हित जास्त जपण्याच्या प्रयत्नात असतात/ ही वस्तुस्थिती आहे. जे कारखाने किंवा ज्या सहकारी संस्था कर्जबाजारी झाल्या आहेत. त्या कर्जबाजारी का झाल्या ? त्याचा हिशोब द्यायला कुणी तयार नाही. व शेतकऱ्यांच्या नावाने संघटना चालवणारे दर पंचवार्षिक ला आपल्याला आमदारकी खासदारकी मिळावी म्हणून भांडवलदारांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत आहेत.

 एकूणच शेतकरी सर्व बाजूने नाडवला जात आहे. त्यामध्ये उच्चजातीय शेतकऱ्यांचे लागेबांधे हे भांडवलदार राजकारण्यांशी असल्याने त्यांच्या समस्यांचे निराकरण सहज शक्य होते.

 परंतु अल्पभूधारक, सीमांत, अनुसूचित जाती/ जमाती, इतर मागास वर्ग जाती गटातील शेतकरी मात्र समस्यांचे निराकरण करू शकत नाही. बाजारपेठेत याची पत नसल्यामुळे खाजगी सावकाराकडे त्याला हात पसरावा लागतो. त्यातून त्याचे प्रचंड शोषण होते व त्याला कुणीही वाली राहिलेला नाही.

 अशा काळामध्ये अल्पभूधारक, सीमांत, अनुसूचित जाति /जनजाति, आदिवासी  इतर मागास वर्गीय शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी व शिवछत्रपतींच्या स्वप्नातील कृषिप्रधान राज्याची निर्मिती करण्यासाठी शिवशाही शेतकरी संघटना कटिबद्ध असेल.आसे मत अध्यक्ष नितीन दादा आरडे यांनी व्यक्त केले, हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून  सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते